Amalner: घर नावावर करत नाही म्हणून सख्ख्या लहान भावाने डोक्यात मारली पावडी…
अमळनेर घर नावावर करत नाही म्हणून लहान सख्या भावाने डोक्यात पावडी मारून मोठ्या भावास गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील म्हसले गावात दि २९ रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, सुकलाल चुडामन पाटील हे २९ रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजता घरी टीव्ही पाहत होते. त्यावेळी लहान भाऊ जयवंत चुडामन पाटील घरात आला आणि त्याने अचानक कानफटात मारून आईच्या साड्या बाहेर का पडल्या आहेत म्हणत भांडण सुरू केले. घर नावावर का करत नाही असे म्हणून शिवीगाळ करू लागला.
थोड्यावेळाने भाऊ जयवंत व पुतण्या दोघेही परत घरी आले आणि पुतण्याने मागून पकडून ठेवून भावाने डोक्यावर फावड्याने वार केला. त्यामुळे सुकलाल गंभीर जखमी झाला. उपचारासाठी नर्मदा फौंडेशन मध्ये दाखल झाले. संदेश पाटील व सुनील जाधव या पोलिसांनी दवाखाण्यात येऊन जबाब घेतले व अमळनेर पोलीस ठाण्यात जयवंत पाटील व अजय पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुनील जाधव करीत आहेत.






