Amalner: दंगलीतील संशयित आरोपीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यु.. शहरात तणाव पूर्ण शांतता…
अमळनेर शहरात उसळलेल्या दंगलीप्रकरणी अटकेतील संशयित आरोपी तथा माजी नगरसेवक पूत्र अशपाक उर्फ पक्या सलीम शेख (33, दर्गाअली मोहल्ला, गांधलीपुरा,अमळनेर या तरुणाचा बुधवारी सायंकाळी सात वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू ओढवला. दरम्यान, दंगलीतील संशयिताचा मृत्यू झाल्याची वार्ता अमळनेरात धडकल्यानंतर व्यापारीपेठेत प्रचंड खळबळ उडून अवघ्या काही मिनिटात शहर कडकडीत बंद झाले तसेच दगडफेकीसह अन्य अफवांचे पीक जोरात पसरले मात्र पोलीस प्रशासनाने शहरात वाहने फिरवून नागरीकांना कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगत शांतता राखण्याचे आवाहन केले.
अशी आहे दंगलीची पार्श्वभूमी
शुक्रवार, 9 जून रोजी ओट्यावर बसलेल्या तरुणांमध्ये व्हिडिओ पाहण्याचा शाब्दीक वाद हाणामारीवर आल्यानंतर दोन समाजात तुफान दगडफेक होवून दंगल झाली तर दंगेखोरांनी सहाय्यक निरीक्षकालाच तलवार मारून जखमी केले तर काही लोटगाड्याही उलथवल्या. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी होत 61 जणांवर जीवे ठार मारण्यासह दंगलीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. परीस्थिती चिघळू नये यासाठी दोन दिवस प्रांतांनी संचारबंदी लावली.
दंगलीदरम्यान पोलिसांनी सुरूवातीला आधी 29 व नंतर दोन अशा 31 संशयितांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
प्रकृती खालावलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
पोलीस कोठडीत असलेल्या संशयित अशपाक सलीम शेख (33, दर्गाअली मोहल्ला, गांधलीपुरा, अमळनेर) यास मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी असल्याने त्यादरम्यान त्याची प्रकृती खालावल्यानंतर पोलिसांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले व बुधवारी त्याचीन्यायालयीन कोठडी घेतली मात्र सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. ही वार्ता अमळनेर शहरात पोहोचताच अफवांचे पीक पसरले. पाहता-पाहता अवघ्या काही मिनिटात दुकानदारांनी आपापली दुकाने बंद करीत घरचा रस्ता धरला तर नागरीकही मिळेल त्या साधनांनी घरोघरी पोहोचले. नागरीकांना शांतता राखण्याचे व कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.






