अमळनेर:अतिक्रमित जागेवर टपरी ठेल्यावरून मारहाण..!7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल..
अमळनेर तालुक्यातील जानवे येथे अतिक्रमित जागेवर मनाई हुकूम असताना देखील टपरी ठेवली म्हणून दोन लोकांना मारहाण करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सात जणाविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जानवे येथील दीपक भटू पाटील यांच्या घराच्या
दक्षिणेस सुनील भगवान पाटील यांनी अतिक्रमण केले होते. त्याविरोधात दीपक याने न्यायालयात दावा दाखल करून तात्पुरता स्टे हुकूम घेतला आहे. मात्र ३ डिसेम्बर
रोजी सकाळी ८ वाजता सुनील भगवान पाटील, सौरभ सुनील पाटील , दारासिंग रावसाहेब पाटील , भटू विक्रम पाटील , हर्षल भटू पाटील , शुभम भटू पाटील , समाधान विलास पाटील यांनी त्या जागेवर टपरी ठेवण्याचा प्रयत्न केला. दीपक
व त्याची आई हिरकणबाई यांनी ह्या गोष्टी ला विरोध केला त्यामुळे सौरभ व दारासिंग यांनी दीपक ला लाकडी दंडक्याच्या फावड्याने मारहाण केली. तर सुनील व भटू ने हिरकण बाईचा हात पिळून तिच्या बांगड्या फोडल्या व इतरांनी दीपक चा
काका प्रकाश विक्रम पाटील याना कमरेला दगडाने मारहाण केल्याने सातही जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करत आहे.






