Amalner: कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात राष्ट्रीय किसान काँग्रेसचे प्रांतांना निवेदन..
अमळनेर जळगांव जिल्ह्यात कापूस उत्पादक तालुका म्हणून अमळनेर तालुका आघाडीवर असतो.पण अमळनेर येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र चालू केले नाही.अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बाजारात कापसाचे भाव सीसीआय भावापेक्षा 500 ते 1000 रुपयांनी कमी आहेत. जिल्ह्यात 11 केंद्र चालू आहेत पण अमळनेरला केंद्र चालू केले नाही तरी अमळनेर तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करून येथील शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्याकडे निवेदन देऊन राष्ट्रीय किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा.सुभाष पाटील, दिनेश पाटील दिनेश पवार, त्र्यंबक पाटील, विठ्ठल पवार, प्रतापराव पाटील, भानुदास पाटील, अशोक पाटील ,शिवाजी पाटील ,सुरेश पाटील, शरद पाटील, रवींद्र पाटील, रामकृष्ण पाटील, अशोक पाटील सह शेतकरी बांधवांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.






