Amalner: रणधुमाळी 2024: दोन सशांच्या शर्यतीत कासव मारू शकते बाजी…! डॉ अनिल शिंदे यांची कासवाच्या गतीने पण सातत्य ठेवत यशस्वी वाटचाल…
अमळनेर अमळनेर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार असून यात आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी आमदार शिरीष दादा चौधरी(अपक्ष), विद्यमान आमदार आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील (राष्ट्रवादी शिंदे गट) आणि काँग्रेसचे महा विकास आघाडी चे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांच्यात ही तिहेरी लढत रंगणार आहे.दोन्ही आजी माजी आमदार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात मग्न आहेत. एकमेकांचे उणे दुणे, कामांची गुणवत्ता, टक्केवारी कमिशन इ विषयांवर टीका करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार स्वतःची केलेली विकास कामे, लोकांसाठी दिलेले योगदान इ विषयांवर न बोलता एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत.या सर्व प्रकारात डॉ अनिल शिंदे मात्र हळूहळू आपल्या प्रचाराची निश्चित दिशा आखत गावागावात प्रचंड आत्मविश्वासाने लोकांचे प्रेम आणि पाठींबा मिळवत आहेत.
डॉ शिंदे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील प्रचंड मोठे योगदान त्यांना कामी येत आहे. याशिवाय आजही भारतातील ४०% जनता अल्पसंख्यांक,ST SC ह्या सर्व साधारण गरीब जनतेच्या मनात काँग्रेस म्हणजे पंजावर नितांत श्रद्धा आणि विश्वास आहे. महायुतीचे महाराष्ट्रातील एकंदरीत मागील पाच वर्षातील गणिते, घरफोडी, विश्वासघात,” ५० खोके एकदम ok ” हा प्रकार जनतेला मुळीच आवडलेला, पटलेला नाही यामुळे या निवडणुकीत सामान्य जनता या खोक्यांचा निश्चितच नकारात्मक विचार करणार आहे. त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार शिरीषदादा चौधरी ह्यांनी जरी प्रचारात आघाडी घेतली असली तरी अपक्ष उमेदवार कोणत्या पक्षाला पाठिंबा देतो? कोणत्या गटात सामील होतो? हा ही महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सर्व वातावरणात मात्र अत्यंत शांततेत डॉ अनिल शिंदे ह्यांची टीम सकारात्मक प्रचार करत असून तालुक्यातील सर्वात जास्त ज्येष्ठ नेते डॉ शिंदे यांचा प्रचार करत आहेत. महा विकासआघाडीचे सर्व जुने अनुभवी राजकारणी आजच्या घडीला डॉ शिंदे यांच्या बाजूने प्रचार करत आहेत. यात काँग्रेस चे सर्व जुने ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक सेल चे नेते इ चा समावेश आहे. एकूणच काय तर दोन सशांच्या शर्यतीत कासव विजयी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. डॉ शिंदे यांना कमी लेखणे दोन्ही मोठ्या नेत्यांना महागात पडू शकते.






