Amalner

Amalner: रणधुमाळी 2024: महाविकास आघाडीत बिघाडी..! दोन उमेदवारांची बंडखोरी… यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज…

Amalner: रणधुमाळी 2024: महाविकास आघाडीत बिघाडी..! दोन उमेदवारांची बंडखोरी… यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज…

अमळनेर: बऱ्याच दिवसांपासून महाविकास आघाडी आणि शरद पवार राष्ट्रवादी गट यांच्यात अमळनेर येथील उमेदवारीवरून घडामोडी सुरू होत्या. या रस्सीखेच मध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली मोट बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु चित्र स्पष्ट होत नव्हते. मात्र काल रोजी ह्या सर्व प्रयत्नांवर नाट्यमय रित्या पाणी फिरले असून खूप मोठी राजकीय खेळी खेळत अमळनेरची उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जाहीर करण्यात आली. यात डॉ अनिल शिंदे यांची वर्णी लागली आहे. आज त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला आहे .

मात्र यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून दोन उमेदवारांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यात प्रा अशोक पवार यांनी अपक्ष उमेदवारीचे
नामांकन केले असून बंडखोरी केल्याने अमळनेर तालुक्यात एकच चर्चा सुरू आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे के डी पाटील यांनी एक अर्ज अपक्ष आणि एक काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही नेत्यांमुळे मतदान आणि इतर राजकीय समीकरणे बदलतील का? येणाऱ्या दिवसात ते फॉर्म माघारी घेतील का? याकडे सर्वंचे लक्ष लागून आहे.

के डी पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सुलोचना वाघ, तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी, पाटील, माजी तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, मनोज पाटील, तुषार संदानशिव यांच्यासह काही कार्यकर्ते हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button