Amalner

Amalner: रणधुमाळी 2024: 4 उमेदवारांची माघार..12 उमेदवार आखाड्यात.. पहा उमेदवार आणि त्यांचे चिन्ह…

Amalner: रणधुमाळी 2024: 4 उमेदवारांची माघार..12 उमेदवार आखाड्यात.. पहा उमेदवार आणि त्यांचे चिन्ह…

अमळनेर : विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या माघार घेण्याच्या तारखेपर्यंत 4 उमेदवारांनी माघार घेतली असून आता १२ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे.

डॉ अनिल नथु शिंदे (हाताचा पंजा), अनिल भाईदास पाटील (घड्याळ- शिंदे गट), सचिन अशोक बाविस्कर (हत्ती) हे तीन राष्ट्रीय कृत पक्षांचे उमेदवार आहेत. तर अपक्ष शिरीषदादा चौधरी (बॅट ) , अनिल भाईदास पाटील (केक) , अमोल रमेश पाटील (ग्रामोफोन), छबिलाल लालचंद भिल (दुरदर्शन), निंबा धुडकू पाटील(किटली), प्रतिभा रवींद्र पाटील (कुकर), यशवंत उदयसिंग मालचे (विजेचा खांब), रतन भानू भिल शिट्टी , शिवाजी दौलत पाटील (ऑटो रिक्षा) हे उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.एकच चिन्ह जास्त उमेदवारांनी मागितले म्हणून काही जणांना लकी ड्रॉ काढून चिन्ह वाटप करण्यात आले.

वरील 12 पैकी फक्त तिरंगी लढत रंगणार असून काँग्रेस , राष्ट्रवादी आणि अपक्ष शिरीष चौधरी यांच्यातच खरी काट्याची टक्कर होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button