Amalner

Amalner: देवगांव देवळी हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी….

Amalner: देवगांव देवळी हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी….

अमळनेर प्रतिनिधी

देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतिराव हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.
शाळेचे क्रिडा शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले तर शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण केले.
यावेळी शाळेतील आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्यावर मनोगत व्यक्त करत गाणी सादर केली.
शाळेतील शिक्षक एच.ओ.माळी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तर अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले की राजमाता जिजाऊ यांच्या विचाराची आज देशाला गरज आहे.एक आदर्श माताचे मुर्तीमंत उदाहरण आहे. तर आजच्या तरूणांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचाराची गरज आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एच ओ.माळी यांनी केले तर आभार एस.के.महाजन यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button