Amalner

अमळनेर: थकीत मालमत्ता कर धारकांवर न प ची  कार्यवाही..! 3 लाख 70 हजार रु वसूल..!

अमळनेर: थकीत मालमत्ता कर धारकांवर न प ची कार्यवाही

अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी अमळनेर नगरपरिषद हद्दीतील मालमत्ता कर व पाणीपट्टी कर थकबाकी वसुली बाबत नियोजन तथा वसुली मोहीम राबविण्या बाबत सूचना तथा आदेश दिले होते. त्या नुसार दिनांक 7/12/2021 पासून थकीत मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व अनधिकृत नळ संयोजन धारक यांच्यावर कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे.तथा आज रोजी वसुली मोहिमअंतर्गत सुभाष चौक बाजार गल्ली व ढेकु रोड परिसरातील थकीत मालमत्ता धारकांवर कार्यवाही करण्यात आली असून त्याअंतर्गत 8 मालमत्ता धारकांच्या नळ कनेक्शन बंद करण्यात आले असून इतर थकीत मालमत्ता धारकांडून 1,00,000 रुपये रोख व 2,70,000 चा धनादेश अशी रक्कम वसूल करण्यात आली आहे.पथकात समाविष्ठ अधिकारी/ कर्मचारी उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड,कर निरीक्षक जगदिश पदमर,बिल कलेक्टर सतीश बडगुजर , बिल कलेक्टर विजय पाटील, लिपिक अविनाश संदानशिव,दिनेश पाटील,सुभाष सोनवणे इ चा सहभाग होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button