Amalner: पंचायत समिती तर्फे परीक्षा पे चर्चा विषयावर चित्रकला स्पर्धा संपन्न..!15 शाळा आणि 850 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग..!
अमळनेर शहरात पंचायत समिती शिक्षण विभागाकडून परीक्षा पे चर्चा या उपक्रमा अंतर्गत बुधवारी साने गुरुजी विद्या मंदिराच्या एस एम -गोरे सभागृहात चित्रकला स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर चित्रे काढून रंगवली.
या स्पर्धेत शहरातील 15 शाळेचे सुमारे 850 विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयांवर अत्यंत सुंदर चित्र काढून रंगवली, अनेकांनी काढलेली चित्र लक्ष वेधून घेत होते. यावेळी सहायक शिक्षणबउपनिरीक्षक (जळगाव) दीपाली पाटील, तालुका गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, शिक्षण
विस्तार अधिकारी पी. डी. धनगर, भुपेंद्र बाविस्कर, मुख्याध्यापक सुनील पाटील, संजीव पाटील आणिवमुख्याध्यापिका अनिता बोरसे व्यासपीठावर उपस्थित होते. अमळनेर पंचायत समिती बीआरसी व शिक्षण विभाग, साने गुरुजी विद्यालय व सहभागी शाळांमधील शिक्षक मुख्याध्यापकांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी झाली. परीक्षक म्हणून सेवानिवृत्त कलाशिक्षक श्रावण माधव महाजन, विद्या पाटील, धनगर मॅडम यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन आर एम देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी केले.






