Amalner

Amalner: मंगळग्रह मंदिरात महाशिवरात्री निमित्त रुद्रस्वाहाकार महापूजा* अकरा मान्यवरांच्या उपस्थितीत झाले पूजन

Amalner: मंगळग्रह मंदिरात महाशिवरात्री निमित्त रुद्रस्वाहाकार महापूजा* अकरा मान्यवरांच्या उपस्थितीत झाले पूजन

अमळनेर :- येथील श्री मंगळग्रह मंदिरात महाशिवरात्री निमित्त १८ फेब्रुवारी रोजी रुद्रस्वाहाकार महापूजा झाली. विविध अकरा मान्यवरांनी सपत्नीक हे महापूजन केले. मंदिरात कैलास पर्वताचा आकर्षक देखावा बनविण्यात आला होता. सकाळी ९ ते १२ या वेळेत श्री गणपती पुण्यवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्य पूजन, वास्तुपूजन, योगिनी पूजन, सर्वतोभद्र मंडल पूजन, क्षेत्रपाल पूजन, चतुषष्ट भैरव पूजन, नवग्रह पूजन, ईशान्य रुद्रकलश पूजन करण्यात आले. दुपारी १ ते ३ या वेळेत रुद्रस्वाहाकार, स्थापित देवतांचे हवन, बलिदान पूर्णाहुती पूजा करण्यात आली.
यजमान म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव, सामाजिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, बाळासाहेबांची शिवसेना धुळे जिल्हाध्यक्ष सतीश महाले, वडोदा.ता. मुक्ताईनगर येथील सौरभ राजेंद्र फडके, अर्बन बँकेचे संचालक प्रवीण पाटील, नंदुरबार येथील सुवर्णकार व्यापारी मनोज जाधव, धुळे येथील भगत मेडिकलचे संचालक जितेंद्र भगत, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, कै. सुंदराबाई दिनकरराव देशमुख मराठा मंगल कार्यालयाचे उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख या सर्वांनी सपत्निक पूजा केली. दुपारी साडेतीनला महाआरती झाली. दिवसभर तिर्थमहाप्रसादाचे वाटप सुरू होते. हजारो भाविकांनी तिर्थमहाप्रसाद व दर्शनाचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमासाठी मंदिराचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, डि.ए.सोनवणे,यांच्या सह मंदिराच्या सेवेकर्‍यांनी परिश्रम घेतले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा,धुळे युवक जिल्हाध्यक्ष कुणाल पवार,कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जेष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, खा.शि.मंडळाचे चेअरमन हरी भिका वाणी, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, स्वर्णालंकार व्यापारी मदनलाल सराफ, अर्बन बँकेचे संचालक पंकज मुंदडे व अभिषेक पाटील प्रशांत सिंघवी,राजू नांढा,दिलीप गांधी,अनिल रायसोनी,महेश पवार, पोलीस नाईक डॉ.शरद पाटील, कैलास महाजन सेवेकरी उज्वला शाह, विनोद कदम,चंद्रकांत महाजन ,उमाकांत हिरे, आशिष चौधरी,आर. जे.पाटील, राहूल पाटील, निलेश महाजन आदींसह खूप मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
मंदिराचे पुजारी प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, यतीन जोशी, मेहुल कुलकर्णी यांनी पौरहित्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button