Amalner: एड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे मोबाईल प्लॅनेटेरियम
अमळनेर : अड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी मोबाईल प्लॅने स्टेरियम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या ग्रहांचे, यानांचे तसेच तारामंडल यांचे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तारामंडल भ्रमण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तारामंडल भ्रमणाचा अलौकिक आनंद घेऊन आपल्या विविध प्रकारच्या शंकांचे निरासन केले .तसेच शिक्षकांनी देखील तारामंडल भ्रमणाचा आनंद घेतला. यातून विज्ञान युगाचा बोध विद्यार्थ्यांना आला. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेची संचालक पराग पाटील प्राचार्य विकास चौधरी सर प्राचार्य महाजन सर प्राचार्य शर्मा सर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी ते साठी सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.






