Amalner

Amalner: हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न..

Amalner: हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न..

अमळनेर हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर शहरातील ग्रामीण रुग्णालयात झाले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दर वर्षी मुस्लिम समाजातील भाविक पवित्र हज यात्रेसाठी सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे जातात. यात्रेस जाण्यापूर्वी शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करणे सक्तीचे असते या शिबिरात एकुण २६ हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची ग्रामीण रुग्णालयात अल्प दरात सी बी सी, ब्लड शुगर, एक्सरे, के एफ टी व ई सी जी, असे चार पाच वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

सदर माजी नगरसेवक हाजी शेखा मिस्तरी, सामाजिक कार्यकर्ते राजु शेख अलाउद्दीन, सैय्यद मुख्तार अली यांच्या संकल्पनेतून तर वैद्यकीय तपासणी शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे, डॉ संदिप जोशी सह आदि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button