Amalner

Amalner: लायन्स क्लब अमळनेर ने उभारली पाणपोई

Amalner: लायन्स क्लब अमळनेर ने उभारली पाणपोई

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते उदघाटन

अमळनेर(प्रतिनिधी):-
येथील लायन्स क्लब अमळनेर तर्फे मुख्य बाजारपेठेत पाणपोई उभारण्यात आली असून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
एप्रिल महिन्यातच उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्याने तहानलेल्या गरजूंची तहान भागवता यावी या हेतूने लायन्स क्लब अमळनेर तर्फे बाजारपेठेतील पंजाब नॅशनल बँके शेजारील चौकात पाणपोईची सोय करण्यात आली आहे.प्रशांत सरोदे यांनी लायन्स क्लब च्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.शहरातील बस स्थानक भागात देखील एक पाणपोई लवकरच सुरू करणार असल्याचे क्लब चे प्रेसिडेंट योगेश मुंदडे यांनी सांगितले.या ठिकाणी रोज १०० थंडगार जारची व्यवस्था केली जाणार आहे.
यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,लायन्स क्लब चे प्रेसिडेंट योगेश मुंदडे,सेक्रेटरी महावीर पहाडे,एमजेएफ विनोद अग्रवाल,पालिकेचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी,डॉ युसुफ पटेल, डॉ मिलिंद नवसारीकर,प्रदीप अग्रवाल,जितेंद्र जैन,पंकज मुंदडा,विजय पारख,प्रशांत सिंघवी, लालु सोनी,सुशील पारख,मनीष जोशी,दिलीप गांधी,दिनेश मणियार,उदय शाह,सुशील जैन,महेश पवार,पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,सोमचंद संदानशिव,लिओ प्रेसिडेंट हरिओम अग्रवाल,गौतम मुंदडा,किशोर गोलेच्छा उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button