अमळनेर: पोलिसांची सावधानता आणि कार्यतत्परते मुळे 6 वर्षाच्या मुलीचा अपहरण कर्ता अटकेत….राकेशसिंग परदेशी आणि टीम चे सर्वत्र कौतुक..!
अमळनेर देवळी शिवारात खडी मशीन परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील 6 वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. सदर घटनेतील आरोपी हा वरील कुटुंबाकडे पाहुणा म्हणून आला होता. सदर घटनेचा तपास पोलिसांनी शिताफीने करून धुळे जिल्ह्यातील शितनेगाव येथून अटक करून मुलीला आई वडिलांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की देवळी शिवारातील खडी मशीन येथे राहणाऱ्या
अत्तरसिंग गेंदराम आर्या (पावरा) याच्या घरी 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रकाश राजाराम डावर अंजनगाव सेंधवा हा राहुल रमेश पावरा यांच्यासोबत आला. दुपारी जेवण करून केल्यानंतर राहुल मोटरसायकल घेऊन निघून गेला. त्यांनतर प्रकाश डावर याने अत्तरसिंग याला तुमच्या मोटरसायकलवर तुमच्या नातीला माझ्या
नातेवाईकांकडे फिरवून आणतो असे सांगून मोटरसायकल (एमपी 46 , एमएफ 2959) वर घेऊन गेला. तो परत न आल्याने अत्तरसिंग याने राहुल याला विचारले पण प्रकाश आला नाही असे सांगितल्या मुळे प्रकाशने मुलीचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्या विरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर घटना अत्यंत संवेदनशील अशी होती वरिष्ठांचे सदर घटनेकडे गांभीर्याने लक्ष होते कारण आरोपी हा भटका होता त्याचा ठावठिकाणा निश्चित माहीत नव्हता.त्याच्या जवळ मोबाईल नव्हता त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक व विशेष करून चोपडा ग्रामीणचे आयपीएस अधिकारी रावले साहेब हे विशेष करून 24 तास घटनास्थळ व पोलीस स्टेशन येथे हजर होते. सदर मुलीच्या शोधासाठी दोन दिवसापासून सेंधवा वारला या ठिकाणी एक टीम तर दुसरी टीम ही औरंगाबाद चाळीसगाव या भागात सतत शोध घेत होते सदर अपहरण मुलगी ही शेवटी गोपनीय माहितीवरून धुळे ग्रामीण पोलीस स्टेशन ची व मेहुणबारे पोलीस स्टेशन च्या बॉर्डर वरील सिताने या गावात आढळून आले.या संपूर्ण तपासात ह्या गुन्ह्याचे तपास अधिकारी राकेशसिंग परदेशी,मिलिंद पाटील,राहुल पाटील,सिद्धांत शिसोदे ह्या पथकाने कार्यतत्पर पोलीस अधिकारी चोपडे,रावले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यतत्पर राकेशसिंग परदेशी आणि टीम ने सतत पाठपुरावा करून सदर संशयित आरोपीस अटक केली आहे.तसेच मुलीस पालकांच्या स्वाधीन केले आहे. सदर कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.







