Amalner

Amalner: तालुक्यात श्री साई कनिष्ठ महाविद्यालय देवगाव देवळी अमळनेर व सरस्वती आयटीआय देवळी व पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने विज्ञान प्रदर्शन…

Amalner: तालुक्यात श्री साई कनिष्ठ महाविद्यालय देवगाव देवळी अमळनेर व सरस्वती आयटीआय देवळी व पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने विज्ञान प्रदर्शन…

अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन व प्रकल्प मांडण्यासाठी आव्हानात्मक सूचना देण्यात येते की श्री साई कनिष्ठ महाविद्यालय देवगाव देवळी अमळनेर व सरस्वती आयटीआय देवळी व पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्र निर्माण साठी विज्ञान तंत्रज्ञान व गणित हे 49 वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन तारीख 29 ऑगस्ट 2022 ते 30 ऑगस्ट 2022 म्हणजे सोमवार व मंगळवार या दरम्यान भरवण्यात येणार आहे. तरी अमळनेर तालुक्याच्या सर्व शाळांनी व विद्यार्थ्यांनी याचा सहभाग घेऊन फायदा घ्यावा.कार्यक्रमाच् उद्घाटन अमळनेर चे आमदार माननीय श्री दादासो अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील तसेच माजी आमदार स्मिता वाघ माजी आमदार श्री बी एस पाटील माजी कुलगुरू उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ डॉ शिवाजीराव पाटील तसेच आयोजक संस्था श्री साई जूनियर कॉलेज व सरस्वती आयटीआय देवळी चे अध्यक्ष श्री प्रकाश हनुमंतराव पाटील संस्थेचे खजिनदार संभाजी रामराव साळुंखे, सचिव कुवर आर एस तसेच अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री संदीप जी घोरपडे हे प्रथम दिवशी असतील तसेच कार्यक्रमाच्या द्वितीय दिवशी बक्षीस वितरणाचे अध्यक्ष माजी आमदार दादासो शिरीष हिरालाल चौधरी, शिक्षण अधिकारी डॉक्टर नितीन बच्छाव, शिक्षण अधिकारी प्राथमिक तात्यासो विकास पाटील, दादासो विशाल शिंदे, गटविकास अधिकारी श्रीमती दिपाली पाटील मॅडम,विस्ताराधिकारी उच्च माध्यमिक सन्माननीय माध्यमिक व प्राथमिक मुख्याध्यापक संघटना सन्माननीय गणित विज्ञान शिक्षक संघटना शिक्षक भरती टीडीएफ तसेच गटशिक्षणाधिकारी माननीय ताई सो शर्मिला चव्हाण, विस्तार अधिकारी माननीय अण्णासाहेब डीए धनगर, तसेच संस्थेचे पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित राहतील. तरी विद्यार्थ्यांनी सदर विज्ञान प्रदर्शनाचा व तांत्रिक ज्ञान आत्मसात करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेऊन प्रदर्शन पाहण्याचा पालकांनी व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती.

Amalner: तालुक्यात श्री साई कनिष्ठ महाविद्यालय देवगाव देवळी अमळनेर व सरस्वती आयटीआय देवळी व पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने विज्ञान प्रदर्शन...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button