Amalner: शेतातील बेकायदेशीर टॉवर हटवावे…जानवे येथील शेतकऱ्यांचे प्रजासत्ताक दिन उपोषण..!
अमळनेर पावर ग्रीन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कोणतीही परवानगी न घेता शेतात टॉवर उभा केल्याने त्यांच्यावर कायदेशीर करण्यात यावी या मागणीसाठी तालुक्यातील जानवे येथील नंदलाल गोविंद पाटील, व शरद पाटील यांनी 26 जानेवारी उपोषण केले.
प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 29 डिसेंबर रोजी कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी या मागणी संदर्भात निवेदन दिले होते. मात्र त्यावर
अद्याप कोणतेही कार्यवाही करण्यात आलेले नाही.
त्यामुळे 26 जानेवारी रोजी कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागत आहे. संबंधितांवर कुठले कायदेशीर कारवाई करण्यात आलेले नाही. आम्हाला या टावरमुळे कोणतेही पीक घेता येत नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे.
संबंधितांनी माझ्यासह ग्रामपंचायत तहसीलदार प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी यांची कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नाही. तसेच ते दादागिरी करतात त्यामुळे शेतातील बेकायदेशीर टॉवर हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे.






