अमळनेर: गावरानी जागल्या सेना कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवणार
अमळनेर शहर प्रतिनिधी, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत गावरानी जागल्या सेना मार्फत पॅनल उभे करणे संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक
घेण्यात आली.
गावरानी जागल्या सेनेचे पदाधिकारी असलेले श्री चंद्रकांत जगदाळे यांनी बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या लिलावांती त्यांचा शेतमाल व्यापाऱ्याच्या गोडाऊनपर्यंत विना मोबदला पोहोचवून देणेस भाग पाडण्यातनयेत आहे ही बाब शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे असे निदर्शनास आणून देत सविस्तरपणे आपले म्हणणे मांडले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय किसान मोर्चाचे अरुण देशमुख यांनी बाजार समितीतील कापूस या शेतमालाच्या लिलावांती शेतकऱ्यांना बाजार समितीच्या नावाची पावती न देता सट्टाच्या आकड्याप्रमाणे नोंदी नोंदविलेली पावती देण्यात येणे तसेच ज्वारी, बाजरी, मका या वर्गवारीतील भरड धान्याच्या लिलावांती तोल काट्यावरील मोजणी फी शेतकऱ्यास भरावयास लावली जाणे व पुनश्च हिशोब पट्टीत तोलाईची रक्कम कपात करत शेतकऱ्यांची कशी दुहेरी लूट केली जाते ही बाब निदर्शनास आणून देत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांची लूट थांबविणेसाठी गावरानी जगल्या सेना मार्फत स्वतंत्र पॅनल उभे करून निवडणूक लढविण्याची कशी आवश्यकता आहे ? ही बाब तपशिलवार सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना समजावून सांगितली. मराठा सेवा संघाचे पदाधिकारी प्रा. डॉ. विलास पाटील यांनी देखील शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाशी निगडित असलेल्या बाजार समितीत परिवर्तनवादी विचारधारेच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे असे सांगत मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड गावरानी जागल्या सेनेच्या पॅनल सोबत राहीन असे सांगून आपली देखील भूमिका स्पष्ट केली.
उपस्थित असलेल्या विविध कार्यकर्त्यांनी आपले मत मांडताना बाजार समितीत शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबतच्या विविध बाबी निदर्शनास आणून देत बाजार समितीतील शेतकऱ्यांवरील अन्याय व शेतकऱ्यांची लूट थांबविणेसाठी बाजार समितीची निवडणूक लढविणे गरजेचेच आहे या बाबीवर शिक्कामोर्तब केले. विश्वास पाटील यांनी आगामी बाजार समितीची निवडणूक ही पैशाच्या जोरावर केवळ पद, पैसा व प्रतिष्ठेसाठी नव्हेतर शेतकऱ्यांवरील होत असलेला अन्याय दूर करणेसाठी असलेली नैतिकता व नीतिमत्तेच्या जोरावर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचा मान, सन्मान व स्वाभिमान अबाधित ठेवण्यासाठी लढविणेची गरज निदर्शनास आणून देत गावरानी जागल्या सेनेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या लढ्याच्या अनुषंगाने अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रतिक्विंटर एक किलो कट्टी थांबविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे तसेच भारतातील शेतकऱ्यांची दशा कशी दैनंदिन असून भारतातील शेतकरी तोट्यात शेती करत असल्यास संदर्भातील पुरावा म्हणून
वजा उत्पन्न दाखला घेऊन शासनाच्या निदर्शनास आणून दिलेल्या बाबीस अनुसरून राज्य कृषी मूल्य आयोगाने शेतमाल खरेदी संदर्भातील शिफारस केलेला दर व केंद्र सरकारने जाहीर केलेला किमान आधारभूत दर यातील फरकाची रक्कम अर्थात शेतकरी हक्क मूल्य रक्कम शेतकऱ्यांना मिळणोसाठी मा. उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यात येणेची कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचे सांगत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदारसंघातील ११ जागा व ग्रामपंचायत मतदार संघातील ०४ जागा लढविणे संदर्भातील भूमिका स्पष्ट केली. पॅनलचे नाव गावरानी जागल्या शेतकरी पॅनल असे ठरविण्यात आले. दहिवद येथील पंकज पाटील यांनी पॅनल मध्ये अमळनेर तालुक्यातील सर्व गटांचा व गणांचा समावेश होईल अशा पद्धतीने उमेदवारांच्या नाव निश्चितीबाबतची बाब निदर्शनास आणून दिली.
गावरानी जगल्या सेनेच्या शेतकरी पॅनलमध्ये उमेदवारी करणेसाठी आम्ही इच्छुक आहोत असे श्री रमेश व्यंकट पाटील – गडखांब, वावडे येथील स्वेच्छा सेवानिवृत्त सैनिक संजय पाटील, शहापूर येथील राजेंद्र माळी, लोण येथील हिरामन पाटील, झाडी येथील रवींद्र पाटील, नगाव येथील बापू कोळी यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली.
अमळनेर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची तातडीने बैठक दिनांक २६ मार्च रोजी घेऊन उमेदवारांच्या नावांची निश्चिती करावी असे ठरविण्यात आले . बैठकीस जानवे, वावडे, झाडी, शहापूर, अमळगाव, पातोंडा, नगाव, गडखांब, अंतुर्ली, शिरसाळे, खौशी,दहिवद, गांधली, भोरटेक, मंगरूळ, धार अश्या विविध गावांचे कार्यकर्ते उपस्थित होते. गावरानी जागल्या शेतकरी पॅनलमार्फत
शेतकरी हितार्थ प्रामाणिक दृष्टिकोनातून उमेदवारी करू इच्छित असलेल्या अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बळीराजा भुवन,साने गुरुजी हौ. सोसायटी, अमळनेर येथील चंद्रकांत जगदाळे यांचेशी संपर्क करण्याचे तसेच दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी ०४
वाजता बळीराजा भुवन, साने गुरुजी हाऊसिंग सोसायटी, अमळनेर येथे घेण्यात येणाऱ्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.






