Amalner: मनीकांत राठोड यांचे वर गुन्हा दाखल करा अमळनेर काँग्रेसची मागणी…
अमळनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटी तर्फे, अमळनेर पोलीस स्टेशनला निवेदन दिले गेले. त्यात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी, मनीकांत राठोड यांनी दिली. मानिकांत राठोड हे भाजपचे कर्नाटकातील चित्तपुर विधानसभेचे उमेदवार आहेत. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. कर्नाटकात त्यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. मा.खारगे साहेब व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मनिकांत राठोड यांचेपासून धोका संभवतो. म्हणून मनीकांत राठोड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा. अशी मागणी, जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री बाळासाहेब प्रदीप पवार, जिल्हा ओ.बी. सी. अध्यक्ष श्री डी.डी. नाना पाटील, रावसाहेब के डी पाटील,मार्केट संचालक डॉ. अनिल शिंदे, काँग्रेस अध्यक्ष श्री गोकुळ पाटील. शहराध्यक्ष श्री मनोज पाटील, माजी अध्यक्ष बी.के सूर्यवंशी, श्रीमन्ना भाऊ शर्मा, किसन काँग्रेस जिल्हा अध्यक्ष श्री सुरेश पाटील प्रा. सुभाष पाटील, रोहिदास दाजी, नीलकंठ सोनू पाटील, कन्हैयालाल कापडे, प्रताप नगराज पाटील, तुषार सांदांशिव, प्रवीण जैन, प्रमोद पाटील, सय्यद सत्तार तेली, सलीम कुरेशी ,जुबेर भाई पठाण, अमजद पठाण, आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.






