Amalner: दोन भावात मालमत्ते वरून हाणामारी..!एकजण गंभीर जखमी..!
अमळनेर येथील गांधलीपुरा भागात मालमत्तेवरून दोन भावात वाद झाल्यामुळे मारहाण करून एकाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
त्याला धुळे जिल्हा सरकाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गांधलीपुरा भागात राहणारे कांती रमजान तेली आणि इतर 5 ते 6 जणांचे रज्जाक रमजान तेली याच्याशी भांडण झाले. त्यात रज्जाक वर शस्त्राने हल्ला करण्यात आला असून त्याचा पाय देखील मोडला आहे. जखमी गंभीर अवस्थेत असल्याने त्यास धुळे येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.पोलिस त्याचा जबाब घ्यायला धुळे येथे गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






