Amalner

Amalner: ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्या बद्दल भुजबळ समर्थकांनी केला शासनाचा जाहीर निषेध…

Amalner: ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्या बद्दल भुजबळ समर्थकांनी केला शासनाचा जाहीर निषेध…

अमळनेर ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आले आहे. त्यामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद भुजबळ समर्थक व समस्त ओबीसी समाजतर्फे महायुतीच्या व शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. भुजबळ यांना सन्मानपूर्वक वागणूक देण्यात आली नाहीतर महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल व महायुती सरकारला त्याची जागा दाखवेल असे आंदोलकांतर्फे घोषणाबाजी देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

रविवार, १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात ओबीसी नेते छगन भुजबळ यांना घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यभरातून आता समता परिषद व ओबीसी समाजातर्फे आंदोलने व निषेध व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्ष, दीड वर्षांपासून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरील वार स्वतः च्या अंगावर घेत भुजबळ यांनी लढा दिला. त्यांनाच अजित पवार यांनी मंत्रिपद दिले नाही. वास्तविक पाहता जर छगन भुजबळ तुमच्या सोबत नसते तर अजित पवार गटाचे दहा आमदार व महायुतीचे जेवढे आमदार देखील निवडून आले नसते, अशा शब्दांत ओबीसी आंदोलक यांनी निषेध व्यक्त केला. महायुतीच्या मोठ्या विजयामध्ये ओबीसींचे योगदान आहे. भुजबळ यांनी मागील दीड वर्ष ओबीसींच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि सरकारवर होणाऱ्या आरोपांना सामोरे जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारे वार स्वतः वर घेतले. अशा या ओबीसींच्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले आले नाही त्यांच्या पाठीत खंजीर करण्यात आला असेही आंदोलनतर्फे सांगण्यात आले. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव महाजन, समता परिषदेचे जिल्हा मार्गदर्शक दिनेश माळी, माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन ,उपाध्यक्ष रमेश महाजन, माजी नगरसेवक देविदास भगवान, अर्बन बँकेचे संचालक लक्ष्मण पांडुरंग महाजन, तुळशीराम तुकाराम महाजन, ईश्वर महाजन, श्रावण महाजन, पंडित महाजन, संजय महाजन, गणेश महाजन, बाबूलाल पाटील, कैलास महाजन , गणेश महाजन,जयंत महाजन ,ईश्वर चौधरी, प्रवीण महाजन यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व भुजबळ समर्थक तसेच ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धडा शिकवणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचा यांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही. तर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाज यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी दिला.

भाजपाचा ‘डीएनए’ कोणता ?

मागील काही महिन्यात राज्यात सुरू झालेल्या मराठा ओबीसी आरक्षणाच्या संघर्षांवरुन अडचणीत सापडलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितले होते की, भाजपाचा डीएनए हा ओबीसी आहे. मग, आता तुम्हाला ओबीसींनी भरभरून प्रतिसाद दिला आणि तुम्ही ओबीसींच्या नेत्यांनाच डावलले ! त्यामुळे आता भाजपाचा ‘डीएनए’ कोणता ? हे ओबीसी समाजाला तपासावे लागेल. अशी प्रतिक्रिया अमळनेर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button