Amalner

Amalner: एसटी डेपो चा मनमानी कारभार…मनसे चे निवेदन…

Amalner: एसटी डेपो चा मनमानी कारभार…मनसे चे निवेदन…

अमळनेर तालुक्यातील संपूर्ण एसटी बसेस वेळेवर लागत नसल्यामुळे विद्यार्थी वृद्ध महिला व कामगार प्रवासी बंधूंना खूप त्रास सहन करावा लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांना बस वेळेवर येत नसल्यामुळे त्यांना कॉलेज व शाळेला क्लासेसला व् उपस्थित राहत येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर खूप मोठा परिणाम होत आहे. तसेच कामगार बंधूंना कामावर वेळेवर उपस्थित राहता येत नसल्यामुळे त्यांच्या रोजगार वर मोठा परिणाम होत आहे व प्रताप कॉलेज चे जे धाड, मारवड, डांगरीम कळमसरे व इतर विद्यार्थी व विद्यार्थिनीनी मनसेकडे अशी कंप्लेंट केली की बस ड्रायव्हर प्रताप कॉलेज बस थांबकावर गाडी थांबवत नाही व तिथं महामंडळाने बस थांबा केला असल्याने पण गाडी थांबत नसल्याने कॉलेज विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायंकाळची 5.15 ची जी बस आहे ती कॉलेज जवळ थांबत नसल्यामुळे त्यांना कॉलेज तर बस स्टॅन्ड पर्यंत पायी चालत जात असल्यामुळे ती गाडी त्यांना सापडत नाही. म्हणून विद्यार्थी व विद्यार्थिनींना रात्र होऊन जाते. म्हणून मनसे ने आगर प्रमुखांना विचारणा केली असता तर त्यांनी सांगितलं की आपण जी पण बस ड्रायव्हरने थांबवली नाही ती गाडीच्या नंबर लिहून आपण माझ्याकडे तक्रार करू शकता व मी आपल्याला लवकरात लवकर सगळ्या गाड्यांची वेळेवर लावण्याची व्यवस्था करतो असे आश्वासन दिले . निवेदन देताना तालुका अध्यक्ष संदिप पाटील (काटे )शहर अध्यक्ष धनजय धनंजय साळुंखे राकेश भाऊ दाभाडे शहर सचिव संकेत पाटील शहर उपाध्यक्ष करण पाटील शहर उपाध्यक्ष गजानन गोसावी सुनील पाटील विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष राहुल शेलकर व मनसे सैनिक उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button