Amalner: मनमानी वसुली..! यात्रे तील दुकाने बंद..!
अमळनेर पालिकेचे यात्रेच्या जागेसाठी ठेका देऊन हात वर केल्याने ठेकेदाराकडून मनमानी वसुली होत असल्याचा आरोप करीत मीना बाजार, कटलरी आणि किरकोळ विक्रेत्यांनी निषेध नोंदवत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे महिलांची मोठी गैरसोय झाली.
यात्रेत नदीपात्रात जागा मिळण्यासाठी पालिकेला भाडे भरावे लागते. मात्र पालिकेने ठेका दिल्याने ठेकेदार अवाजवी वसुली करत आहेत. त्या पावतीवर नाव व शिक्का नाही. पैसे न दिल्यास मारहाण करू आणि माल जप्त करू अशी धमकी दिली जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. फी कमी करत नाही तोपर्यंत दुकाने बंद ठेवू अशी भूमिका दुकानदारांनी घेतल्याने महिलांना खरेदी करता आली नाही. पोलीस नाईक शरद पाटील यांनी व्यापाऱ्यांची समजुत घातली. मुख्याधिकारी सरोदे यांनी लक्ष घालण्याची मागणी दुकानदारांनी केली आहे.






