Amalner: लोकमान्य शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
अमळनेर येथील जनमानसात नाव लौकिक प्राप्त असलेल्या लोकमान्य शिक्षण मंडळाची सभा दि २७ ऑगस्ट २०२२ रोजी संस्थेच्या कार्यालयात अतिशय उत्साहात संपन्न झाली यात सन २०२२ ते २०२५ या त्रैवार्षिक कार्य काळासाठी कार्यकारीणी मंडळाची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्ष स्थानी प्रा. प्र. वि. भावे तर चिटणीस श्री विवेकानंद भांडारकर हे होते. नुतन कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे.
अध्यक्ष प्रा. डॉ. प्रभाकर विश्र्वनाथ भावे उपाध्यक्ष प्रा. धर्मसिंह धनसिंह पाटील
कार्याध्यक्ष प्रा. अरविंद धोंडोजी फुलपगारे कार्योपाध्यक्ष श्री राजेंद्र सच्चिदानंद खाडिलकर लो. वि. चेअरमन प्रा डॉ प्रभाकर जगन्नाथ जोशी न. म. शाळा चेअरमन श्री राजेंद्र पंढरीनाथ नवसारीकर बा. वि. मंदिर चेअरमन श्री वसंत राजधर पाटील
जेष्ठ कार्यकारी सदस्य प्रा. रमेश रामचंद्र बहुगणे कार्यकारी सदस्य श्री गजानन पुंडलिक कुळकर्णी तर सभेस जेष्ठ सदस्य श्री भालचंद्र बापुराव मंजुळ हे उपस्थित होते.






