Amalner: अमळनेरात युवक-युवतींना मिळणार रोजगार.. प्रकाशभाई युवा मंचचा उपक्रम…
अमळनेर येथे लवकरच बेरोजगार तरुण तरुणींसाठी रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.अमळनेर येथे बेरोजगारीची मोठी समस्या असून तरुणांच्या हाताला काम नाही.तालुक्यात कोणताही छोटा मोठा रोजगार किंवा कंपन्या नाहीत की जेथे तरुणांना रोजगार मिळेल.कित्येक तरुण तरुणी मुंबई पुण्यासारख्या शहरात जाऊन छोटा मोठा रोजगार करत आहेत.ही गरज ओळखून श्री प्रकाश भाई पाटील यांनी तरुण तरुणी ना रोजगार उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. श्री प्रकाश (भाई) पाटील युवा मंच, अमळनेर व BSD मार्केटिंग कंपनी तर्फे बेरोजगारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आपल्या अमळनेर शहरात सुरू होत असलेल्या रोजगाराभिमुख लघु उद्योगातून रोजगाराची पेपर मेकिंग कंपनी व गारमेंट इंडस्ट्री (small industry ) आता आपल्या अमळनेर शहरात सुरू होत आहे.तसेच सोबत उच्चशिक्षित/बाहेरगावी जॉबसाठी इच्छुक असलेल्यांसाठी ऑनलाइन बिजनेस करणाऱ्या नामांकित कंपन्यांमध्ये त्वरित नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. चला तर मग मी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि अर्ज भरा…
अर्ज भरण्यासाठी www.prakashbhaipatil.com
ह्या दृष्टीने श्री प्रकाश भाई पाटील यांनी मिशन रोजगार व बेरोजगारीच्या दृष्टीने संकल्पातील पहिले पाऊल उचलले असून त्यांची यातून दूरदृष्टी दिसून येत आहे.
या संधीचा लाभ घ्या व इतरांना देखील शेअर करा
#मिशनरोजगार #युवामंच #अमळनेर #व्यवसाय #बेरोजगारी #प्रकाशपाटील ..






