Amalner: अमळनेरच्या विद्यार्थिनीची विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धे साठी निवड..!
अमळनेर येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलची दहावीची विद्यार्थिनी अदिती पाटील हिने चाळीसगाव येथे झालेल्या ‘विभागीय सॉफ्ट टेनिस ‘स्पर्धेत यश संपादन केले. यानंतर तिची निवड सातारा येथे होणाऱ्या ‘राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस’ स्पर्धेसाठी झालेली आहे. तिला क्रीडा शिक्षक सुनील करंदीकर यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे संचालक नीरज अग्रवाल, मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे व उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी या विद्यार्थिनीचे कौतुक केले.






