Amalner

Amalner: ऍड. सारांश सोनार यांनी पटकावले टाटा मोटर्स कलासागरचे राज्यस्तरीय उपविजेतेपद !

Amalner: ऍड. सारांश सोनार यांनी पटकावले टाटा मोटर्स कलासागरचे राज्यस्तरीय उपविजेतेपद !

अमळनेर –
पुणे येथे संपन्न झालेल्या टाटा मोटर्स आयोजित कलासागर राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत अमळनेरचे ऍड. सारांश धनंजय सोनार यांनी उपविजेतेपद पटकावले. त्यांना टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष मोहन सावरकर यांचे हस्ते गौरविण्यात आले.
युवकांना प्रेरित करणाऱ्या या स्पर्धेत प्रसिद्ध युवावक्ता सारांश धनंजय सोनार यांनी ‘भारत हा सर्व समावेशक देश आहे’ या विषयावर प्रभावी मत प्रदर्शन करून रसिकांची दाद मिळविली . टाटामोटर्सचे उपाध्यक्ष मोहन सावरकर यांचे हस्ते दिमाखदार सोहळ्यात सारांश सोनार यांना आकर्षक मानपत्र, स्मृतीचषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. अत्यन्त चुरशीच्या या स्पर्धेत राज्यातील नामांकित युवावक्त्यांनी भाग घेतला होता.
राज्यभरातील असंख्य युवकयुवतींच्या प्रचंड प्रतिसादात पार पडलेल्या टाटा मोटर्स कलासागर या कार्यक्रमाचं उपविजेतेपद प्राप्त केल्याबद्दल ऍड सारांश यांचे प्रा.डॉ. विजय घोरपडे , प्रा डॉ विजय तुंटे , डिगंबर महाले, ऍड. एस आर पाटील डॉ जी एम पाटील, प्रा डॉ नितीन पाटील, प्रा डॉ संदीप नेरकर, प्रा डॉ रमेश माने, प्रा पराग पाटील, प्रा डॉ लीलाधर पाटील, ऍड एस आर पाटील, संदीप घोरपडे, सतीश देशमुख, रवींद्र विसपुते, अमळनेर वकील संघ, सुवर्णकार समाज व तालुक्यातील पत्रकार बांधवांनी अभिनंदन व कौतुक केले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button