Amalner: एक विचार देशातील सर्वपक्षीय नागरिकांसाठी..आम जनतेचा पैसा राज्यकर्त्यांचे लाड पुरवू नये….
देशातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, विधान परिषद आमदार, राज्यसभा खासदार, शिक्षक आमदार, अजून जे काही असतील या सगळ्यांचाच, जेवढेही जनतेच्या पैशांवर निवडणूक प्रचार करीत आहेत, असे सर्व महाशयानी आपापल्या पक्षाचा आणि आपापल्या हिताचा प्रचार करेपर्यंत कोणीही, (आम जनतेचा कर रुपी), मधून जमा झालेल्या पैशांमधून आणि भारत सरकारच्या तिजोरीवर पडणारा भार मधून देशातील नागरिकांचे काम न करता महिन्याचा पगार घेऊ नये, असा जाहीरनामा महामाहीम भारताचे राष्ट्रपती यांनी जाहीर करावा, आणि निवडणूक आयोगामार्फत हा संपूर्ण महाराष्ट्रात असो अथवा देशातील कुठलेही राज्यात निवडणूक असो, त्या राज्यासाठी अथवा त्या ठिकाणी, जो कोणी देशाचा आम जनतेचा पगार घेऊन प्रचार करीत असेल, त्याचा पगार बंद करण्यात यावा.. त्यांना आम जनतेच्या जमा झालेल्या करातून पैसा घेण्याचा नैतिक अधिकार नाही, आमचा पैसा हा आम्ही भारत देशातील सर्व नागरिक भारताच्या सर्वांगीण विकासासाठी देत असतो, त्यामुळे असले लबाडी लुच्चीने राजकारण करणारे,, देशातील लोकप्रतिनिधींनवर हा पैसा वापरला जाऊ नये.. असा जाहीरनामा देशातील लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, या तिन्ही असेंबली मधून पास व्हायलाच पाहिजे..
एक विचार आझाद भारताच्या नागरिकांसाठी..
संतोष पाटील, अमळनेर
हिंदुस्तान जागृत मंच,
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य-8999859021..






