Amalner

Amalner: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी घेतली आढावा बैठक…

Amalner: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी घेतली आढावा बैठक…

अमळनेर : लवकरच पावसाळा सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी आढावा बैठक घेतली.मान्सून दाखल होण्यापूर्वी तालुक्यात येणाऱ्या भावी आपत्ती ना सामोरे जाण्यासाठी उपाय योजना करण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली होती.मान्सूनच्या वेळी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी वेळेपूर्वी सर्व यंत्रणा सतर्क ठेवणे, आवश्यक त्या यंत्रणा दुरुस्त करून संपर्क तात्काळ होण्याचे नियोजन करणे, वीज पडणे, पुर येणे, ई नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा तयार ठेवण्या संदर्भात सूचना उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिल्या.

पावसाळा सुरू झाला म्हणजे वीजपुरवठा सतत खंडित होत असतो, अनेक ठिकाणी झाडांवर विजेचे तार असतात त्यामुळे महावितरणने विजेच्या तारांना झाडे व त्यांच्या फांद्या नडत असतील तर ते काढून घेणे,नाले खोलीकरण सफाई करून घेणे, जेणेकरून पाण्याचे प्रवाह रोखून पाणी तुंबणार नाही, नदी काठावरील अतिक्रमण आणि नागरिकांना सूचना देणे, स्थलांतर करून घेण्यासंदर्भात सूचना केल्या.आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा यांनी सतर्क राहावे. महत्वाच्या सूचना गावागावात पोहचविण्यासाठी दवंडी, संपर्क क्रमांक द्वारे माहिती द्यावी असेही यावेळी सांगण्यात आले.

दैनंदिन जीवन सुरळीत राहील आणि जीवित व वित्त हानी होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने खबरदारी घायची आहे. अशा सूचना या आढावा बैठकीत देण्यात आल्या. या बैठकीला तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता तुषार नेमाडे, बांधकाम खात्याचे
उपविभागीय अभियंता हेमंत महाजन, निम्न तापी प्रकल्पाचे जितेंद्र याज्ञीक, मुख्याधिकारी तुषार नेरकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे, विद्युत
अभियंता हेमंत सैंदाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, विस्तार अधिकारी एस. एस. कठळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे डी.
आर. पाटील, आरोग्य विभागाचे टी. एस. पाटील, ए. आर. कोठावदे ई उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button