Amalner: महिला महाविद्यालयात न्यू एज्युकेशन पॉलिसी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न,..
नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुखमिणीताई महिला महाविद्यालयात एन. इ. पी. 2020 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या प्रंसगी रिसोर्स पर्सन महणून प्रताप महाविद्यालयाचे एन. इ.पी. समन्वयक डॉ. मुकेश भोळे उपस्थित होते . कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना कसे लाभदायक आहे तसेच नवीन शैक्षणिक धोरणाचे सहा विषय सोप्या पद्धतीने विद्यार्थी आणि प्राध्यापकांना सांगितले .
कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी बोलतांना प्राचार्य डॉ. एस. जे. शेख यांनी नवीन शैक्षणिक धोरणात डि. जी. लॉकर आणि ॲकडमिक बँक ऑफ क्रेडिट या बद्दल माहिती दिली.
कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या आय . क्यू. ए. सी. विभाग व एन. ई.पी. विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. मंजुषा खरोले यांनी तर आभार डॉ. अमोल दंडवते यांनी मानले.
कार्यशाळेत प्रा. डॉ. जाधव, प्रा. ठाकरे, प्रा. सैंदाणे, प्रा. साळुंके, प्रा. वाघमारे , कु. आकाक्षा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्राध्यापककेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.






