प्रजासत्ताक दिनानिमित्त पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या शाखा नंदुरबार जिल्हा टिमच्या वतीने T शर्ट व वृक्ष वाटप
नंदुरबार सुभाष पाडवी
रविवार, दि.२६ जानेवारी २०२० रोजी, मौजे सिसा ता. अक्राणी,जि.नंदुरबार येथे वृक्ष लागवड करणाऱ्या तरुणांना, संस्थापक मा.श्री देवा तांबे संस्थापित पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था,भारत संस्थेच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्ष मा.सुभाष पाडवी तसेच अक्राणी तालुका अध्यक्ष श्री.पंडित मानसिंग पाडवीसचिव विशाल पाडवी व नंदुरबार जिल्हा पर्यावरण टिम च्या सहकार्याने पर्यावरण संदेश देणारे टी शर्ट व वृक्षांची रोपे वाटप करण्यात आली,ज्यांच्या ग्रुपला *ग्राम हरित सेना,सिसा* हे नाव देण्यात आले आहे. टी शर्ट वर “वृक्ष तोड करू नका, जीवन धोक्यात टाकू नका” व “सावली पाहिजे ना भाऊ?मग ह्या वर्षी एक तरी झाड लावू.”
अशी पर्यावरणीय घोषवाक्ये लिहून पर्यावरण विषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.कार्यक्रमाची सुरुवात अतिथींचे वृक्ष देऊन स्वागत करून करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शंकर वसावे, उपसरपंच उमरागव्हाण हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष सुभाष पाडवी यांनी केले तर उपाध्यक्ष रमेश पाडवी यांनी अनेक कृषीविषयक योजनांची माहिती उपस्थितांना दिली. त्यात मनरेगा,भाऊसाहेब पुंडकर वृक्ष लागवड योजना, मागेल त्याला शेत तळे,मत्स्यशेती इ. विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते तरुणांना टी शर्ट व वृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी युवराज पाडवी,रतीलाल पाडवी,मोहन पाडवी,गुरज्या पाडवी,मोतीलाल पाडवी, दामोदर पाडवी,गणेश पाडवी,प्रकाश पाडवी यांना टी शर्ट वाटप करण्यात आले.
अक्राणी तालुका अध्यक्ष पंडित पाडवी यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंडित पाडवी,विशाल पाडवी (सचिव) यांनी मोलाचे योगदान दिले.






