Maharashtra

आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने एक लाख मास्क वाटप

आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने एक लाख मास्क वाटप

शिवभोजन केंद्राचीही उद्घाटन.

कोल्हापूर–कागल प्रतिनिधी –तुकाराम पाटील

ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघात एक लाख सॅनिटरी मासचे वाटप करण्यात आले. कागल येथील बसस्थानकाजवळ शिवभोजन केंद्राचीही उद्घाटन झाले. मंत्री मुश्रीफ यांच्या 66 व्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमांचे आयोजन केले आहे.

आमदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन, कागल विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि कागल नगरपालिका यांच्यावतीने हे मास्क उपलब्ध केले आहेत. या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणून कागल शहरात कार्यकर्त्यांच्यावतीने घरोघरी मास्कचे वाटप झाले. शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौक व कर्तव्य मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी मार्क वाटप करून व हात धुण्याचा साबण देऊन या मोहिमेची सुरुवात झाली.

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येईपर्यंत या मास्कचे वितरण सुरूच राहणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना केडीसीसीचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, आमचे नेते नामदार हसन साहेब मुश्रीफ यांचा वाढदिवस कोरोना संसर्ग लढाही त्याबद्दलची खबरदारी व सावधगिरीचे उपाय म्हणून अशा उपक्रमांनी साजरा करीत आहोत. “प्रशासनाला देऊ साथ – कोरोनावर करू मात” असे ब्रीद घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते या मोहिमेत जनतेबरोबर आहोत. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने आदी प्रमुख उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button