चंद्रभागा नदी कडे जाणारे सर्व रस्ते केले बंद
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपुरात प्रशासनाने आषाढी यात्रा कोरोना च्या पार्श्वभूमीवर रद्द केलेली असल्याने चंद्रभागे वरील असणारे सर्व घाट बॅरॅकेटस लावून बंद करण्यात आले आहेत चंद्रभागा नदी वर असणारे दगडी पुल ते स्मशान भूमी दरम्यान असलेले सर्व घाट लाकडी वासे लावून बंद करण्यात आले आहेत हे घाट उतरताना वरच्या बाजूस आणि घाटावरून वर प्रवेश करतो अशा दोन्ही ठिकाणी बंद करण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला आहे याची पाहणी करण्यासाठी स्वतः मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे या ठिकाणी आले होते. प्रत्येक घाटावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्याच बरोबर दत्त घाट उद्धव घाट कुंभार घाट चंद्रभागा घाट या ठिकाणी असलेले शहरातील बेघर व वृद्ध व्यक्ती नगरपरिषदेच्या अतिक्रमण वाहनात बसून त्यांच्या सामानासह ही त्यांना शहरातील केंद्र सरकारने सुरू केलेल्या बेघर निवास येथे हलविण्यात आले आहे.






