Rawer

सर्वधर्म समभाव जोपासनारे पोलिस वर्दीतील दर्दी अधिकारी सपोनि राहुल जी वाघ…

सर्वधर्म समभाव जोपासनारे पोलिस वर्दीतील दर्दी अधिकारी सपोनि राहुल जी वाघ…

प्रतिनिधी : मुबारक तडवी


रावेर :सावदा पोलिस स्थानकातून नुकतेच नाशिक ग्रामीण पोलिस स्टेशन ला बदली झालेले कर्तव्यदक्ष, कार्यक्षम, कर्मनिष्ठ लोकप्रितेसह गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांनी सावदा पोलिस स्टेशनचे सुत्र हाती घेतल्यानंतर सावदा पोलिस स्टेशन हद्दीतील ३२ गावांत लोकप्रियता मिळवली तिचं म्हणजे सामाजिक एकात्मतेचा संदेश देत सर्वधर्मसमभाव चां वसा अंगीकारत जातिय सलोखा निर्माण करीत त्यांनी कधीही जातीधर्म,लहानमोठा गरिबश्रीमंत असा कोणताही भेदभाव न जुमानता आपला कार्यकाळ स्मितभाषी, प्रेमळपणे,तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर खाकीचा वचपा बसवत सावदा पोलिस स्टेशन हद्दीत लोकप्रियतेसह खाकी वर्दी चां दबदबा ही निर्माण केलेला होता तसेच कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात ही यशस्वी झाले भांडणतंटे,जातियतेढ गटातटाचे भांडणे मिटवण्यास ते शातिरपणाने मिटवण्याचीही त्यांचेकडे जादुई काडी होती चाणाक्ष बुध्दिमत्तेच्या आधारे अनेक दरोडे ,चोरी,खुनी,गुन्ह्यांचा सोक्षमोक्ष त्यांनी कर्तव्यकाळात लावला सावदा पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गावांमध्ये सर्वधर्मीय सण, होळी, दिपावली,दसरा,रमजान, बकरी ईद,मोहरम,भिमजयंती, महापरिनिर्वाण दिन, जागतिक आदिवासी दिन, गणेशोत्सव, नवरात्री उत्सव,लग्नसमारंभ, सुखदुःखात सहभागी होणारे तसेच थोर लहान मोठ्यांना, तसेच पत्रकार समाज सेवक,राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते सर्वांना आपलासा वाटणारा सपोनि राहुलजी वाघ साहेब यांनी सावदा पोलिस स्टेशन हद्दीतील जनमाणसाच्या ह्रदयात स्थान मिळविले आज या आठवणीतील वर्दीतील दर्दी देवमाणूस क्वचितच पाहायला मिळतात त्यांचं सावदा पोलिस स्टेशनचा कर्तव्यकाळ अविस्मरणीय आहे सपोनि राहुलजी वाघ यांची नाशिक ग्रामीण पोलिस स्टेशन ला बदली झाली असून पुढील भावी वाटचालीस परिसरातील नागरिकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button