Faijpur

अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयाच्या खेळाडूंचे वर्चस्व

अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयाच्या खेळाडूंचे वर्चस्व

सलीम पिंजारी

फैजपूर- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तर्फे धनाजी नाना महाविद्यालयाच्या 05 पुरुष आणि 04 महिला खेळाडूंची निवड विद्यापीठ संघात झाली होती. त्यापैकी 04 पुरुष आणि 02 महिला खेळाडूंनी अखिल भारतीय अंतर विद्यापीठ भारत्तोलन क्रीडा प्रकारात सहभाग नोंदविला. विषेश अभिनंदन करण्यासारखी म्हणजे महाविद्यालयाच्या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवरती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचा नावलौकिक वाढविला.

चंदीगड विद्यापीठ मोहाली (पंजाब) येथे झालेल्या पुरुषांच्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयाचा प्रशांत सुरेश कोळी प्रथम वर्ष कलाचा विद्यार्थी 55 किलो वजन गटात 104 किलो स्नँच व 122 किलो क्लिन अँण्ड जर्क असे एकुण 226 किलो उचलुन रौप्य पदक प्राप्त केले तसेच कल्पेश चंद्रकांत महाजन एम.कॉम. द्वितीय वर्षाचा खेळाडू याने 73 किलो वजन गटात 110 किलो स्नँच व 149 किलो क्लिन अँण्ड जर्क असे एकुण 259 किलो वजन उचलुन रौप्य पदक प्राप्त केले. या दोन्ही खेळाडूंची निवड भुवनेश्वर (उडीसा) येथे होणा-या पहिल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खेलो इंडीया खेलो या स्पर्धेसाठी झालेले आहे.

तिरुवेल्लुर विद्यापीठ (तमीलनाडू) येथे झालेल्या महिलांच्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ भारत्तोलन या स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयाच्या महिला खेळाडूने विद्यापीठाच्या इतिहासात सर्वात प्रथम एवढी चांगली कामगीरी केलेली आहे. कुमारी प्रेरणा किशोर सोनवणे द्वितीय वर्ष कलाची विद्यार्थीनी या खेळाडूने 45 किलो वजन गटात 56 किलो स्नँच व 68 किलो क्लिन अँण्ड जर्क असे एकुण 124 किलो वजन उचलुन चौथा क्रमांक प्राप्त केला. त्यासोबतच कुमारी आरती विनोद सुरवाडे द्वितीय वर्ष कला या विद्यार्थीनीने 87 किलोपेक्षा अधिकच्या वजन गटात 56 किलो स्नँच व 80 किलो क्लिन अँण्ड जर्क असे एकुण 136 किलो वजन उचलुन चौथा क्रमांक प्राप्त केला. या दोन्ही महिला खेळाडूंचे भुवनेश्वर (उडीसा) येथे होणा-या खेलो इंडीया खेलो या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
विद्यापीठ संघाचे प्रशिक्षक म्हणुन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.गोविंद सदाशिवराव मारतळे यांनी 2009 पासुन आतापर्यंत विद्यापीठाला सलग अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेचे पदक प्राप्त करुन दिलेले आहे. यावर्षी डॉ. मारतळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाला 03 रौप्य पदक प्राप्त झालेले आहे. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार रावेर यावल तालुका श्री. शिरीषदादा मधुकरराव चौधरी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारणी मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी सर, सर्व उपप्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व खेळाडू मित्र, जिमखाना समितीचे चेअरमन डॉ.सतिष चौधरी, सर्व जिमखाना समितीचे सदस्य व सर्व मित्र परीवार यांनी खेळाडू तसेच क्रीडा संचालक डॉ. मारतळे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस के.चौधरी, सचिव प्रा.एम.टी.फिरके, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, प्रा. डॉ.सतिष चौधरी, प्रा.डॉ.गोविंद मारतळे, प्रा.सौ.वंदना बोरोले, व विजयी खेळाडू

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button