संबंधित शिक्षकाचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करणार -रावेर गटशिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख सादर करणार चौकशी अहवाल
मुबारक तडवी मोठा वाघोदा
मोठा वाघोदा : मोठा वाघोदा जि.प.उर्दु शाळेच्या शिक्षकांची शाळेकडे पाठ.५०% उपस्थितीचे शासनादेश असतांनाही शिक्षक पदवीधर शिक्षक शे.हनिफ.शे.रशिद (पिंजारी) गैरहजर असल्याची तक्रार
मोठा वाघोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कालू मिस्तरी यांनी रावेर गटशिक्षणाधिकारी यांना केली होती त्या तक्रारीची दखल घेत केद्र प्रमुख यांचं मार्फत चौकशी करण्यात आली आहे व चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल व दोषीची पाठराखण केली जानार नसल्याचे ते म्हणाले तसेच दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे ही रावेर प. स. चे. गटशिटशिक्षणाधिकारी श्री.शैलेश दखने यांनी ठोस प्रहार प्रतिनिधी शी बोलताना सांगितले
कोरोना महासंकटकाळी केद्र व राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला मात्र विद्यार्थी शालेय अभ्यास क्रमापासून वंचित राहू नये आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ई लर्निग मोबाईल फोन ,ॲपद्वारे पाठ्यक्रम घरीच राहुन शैक्षणिक धडे गिरवून घेतल्याचे जिल्ह्यातील अनेक गावागावांतील जि.प.च्या शाळांत व शिक्षकांनी परिश्रम घेत यशस्वी केले मात्र मोठा वाघोदा येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेतील शे.हनिफ.शे.रशिद.पिंजारी. पदवीधर शिक्षकाने या ना त्या कारणांनी शासनाच्या व शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या आदेशांनाच तिलांजली देऊन शासना आदेशाचीच पायमल्ली केली असल्याची तसेच शाळेत शिक्षण विभागाने शाळेत ५०% शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आदेश असतानाही संबंधित शिक्षक शाळेत एका दीवशीही फिरकला नसल्याची तक्रार मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायती चे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य शे.चांद .शे.नबी.उर्फ कालु मिस्तरी यांनी या शिक्षकाची सखोल चौकशी करून दोषीं शिक्षकावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे






