अभिनेत्री रेखाचं आर्थिक नियोजन..!पहा कसा भागवते खर्च..!
मुंबई बॉलिवुड अभिनेत्री रेखा ही अत्यन्त सुंदर आणि नेहमीच प्रसिद्धी च्या झोतात असते.सर्वांना नेहमीच हा प्रश्न पडतो की रेखा तीच सर्व आर्थिक नियोजन कसे करते.खरतर चित्रपट नाही जाहिरात नाही कोणताही ठोस उत्पन्नाचा सोर्स नसताना महागड्या साड्या,दागिने,पर्सेस,मोठे इव्हेंट इ सगळं रेखा कस मॅनेज करते.सर्वात महत्त्वाचे म्हणजे राहणीमान अत्यन्त टापटीप असते.जबरदस्त फॅशन सेन्स आणि आरोग्य ह्या जोरावर रेखा आजही तरुण अभिनेत्रिं ना जोरदार टक्कर देते.कोणत्याही इव्हेंट मध्ये सर्वात प्रथम रेखा उपस्थित असेल तर लक्ष वेधून घेते.बॉलिवूड च्या सर्व हॉट आणि नितांत सुंदर अभिनेत्री रेखा समोर नेहमीच फिक्या पडतात.तर प्रश्न हाच उरतो की रेखा हे सर्व कसं मॅनेज करते..
लहानपणापासून अभिनय क्षेत्रात काम सुरू केल्यानंतर रेखाने खूप पैसा आणि स्टारडम कमावलं पण काही किस्से असे घडले की ज्यांनी रेखाला व्यवहारी बनवलं..खूप उशिरा रेखा आपल्या आयुष्यात व्यवहारी बनली..पण नंतर मात्र रेखा ही नेहमीच व्यवहारी व्यक्ती म्हणून तिने खूप बचत केली..अश्या एका घटनेने आणि वेळेने रेखाचे डोळे उघडले. तिनं हळूह्ळू हिशोबाच्या नाड्या आपल्या हातात घेत आर्थिक नियोजन करायला सुरवात केली.
आर्थिक गुंतवणुकीवर भर दिला त्यामुळे तिच्या दूरदर्शी पणा पणे आज तिला उदरनिर्वाहासाठी वेगळं काही करायची गरज नाही. गुंतवणूक हेच तिच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. रेखाचा फॅशन सेन्स उत्तम आहे आणि अनावश्यक खर्च करत नाही त्यामुळे तीच नियोजन परफेक्ट राहत.
तिच्या सुप्रसिध्द सोनेरी कांजीवरमही याला अपवाद नाही.तिला एकदा प्रश्न विचारला होता की दरवेळेस असा परफेक्ट लूक कसा काय जमतो? तिच्याकडे नेमक्या किती कांजीवरम आहेत? यावर ती म्हणाली की, खरंतर माझ्याकडे अगदी मोजक्या कांजीवरम आहेत मात्र मी दरवेळेस त्या नेसताना मिक्स ॲण्ड मॅच कॉम्बिनेशन अशा खुबीनं करते की बघणार्याला वाटतं मी पहिल्यांदाच ही साडी नेसली आहे. रेखाचा जबरदस्त फॅशन सेन्स तिला मदत करतो.
याशिवाय ती ज्या ज्या रिॲलिटी शोमध्ये पाहुणी म्हणून, जज म्हणून उपस्थिती लावते त्याची फी घेते.मग ते पुरस्कार सोहळे असो की एखाद्या कार्यक्रमाचे उद्घाटन.. तिच्या निव्वळ उपस्थितीसाठी आयोजक तिला मानधन देतात. यामुळेच एकही चित्रपट,जाहिरात किंवा दुसरे कोणतेही काम न करताही रेखाचा उदरर्निवाह वर्षानुवर्षं आरामात चालला आहे.






