त्रिपुरामध्ये धार्मिक स्थळ दुकाने घरांची जाळपोळ करणाऱ्या दंगलखोरांवर कारवाई व्हावी : सावदा-फैजपुर व रावेर येथील मुस्लिम अल्पसंख्यांक लोकांची मागणी“त्रिपुरामध्ये अराजकता माजवून संवेदनाहीन दंगलखोरांनी अमानुषपणे कसा अन्याय अत्याचार येथील मुस्लिम अल्पसंख्यांक समाजासह त्यांचे धार्मिक स्थळ सोबत काय केले. तसेच येथील लोकांना कशाप्रकारे जीवे ठार मारले. तसेच मोहम्मद पैगंबर अ.स. यांच्याबाबत गलिच्छ भाषेतून अपशब्द वापरून संपूर्ण देशातील मुस्लिम समाजाची धार्मिक भावना देखील दुखावली आणि हे संपूर्ण घटना जगाला कडून चुकलेली आहे. याचा निषेध केला तेवढा कमी हे मात्रा खरे आहे.”
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर, येथील मुस्लिम अल्पसंख्यांक बांधवांनी त्रिपुरा राज्यात काही विशिष्ट संघटनेचे लोकांनी मोहम्मद पैगंबर स.अ. यांच्याविषयी गलीतच भाषेचा वापर करून अपशब्द बोलून संपूर्ण जगातील इस्लाम धर्माचे लोकांची धार्मिक भावना दुखावली तसेच त्रिपुरामध्ये (मस्जिद) धार्मिक स्थळ सह येथील मुस्लिमांचे घर दुकाने यांची जाळपोळ केली.या दंगलीत अनेक मुस्लिमांना निर्दयी व अमानुषपणे जीवे ठार देखील मारण्यात आले. तरी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींविरुद्ध कायद्याच्या चौकटीत फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच नुकसानग्रस्त लोकांना शासनाकडून नुकसान भरपाई सह त्यांचे संरक्षण करण्यात यावे. अशी मागणीचे निवेदन रावेर तहसीलदार यांच्या माध्यमातून देशाचे राष्ट्रपती यांना केली आहे. सदरील निवेदन देत यावेळी शेख ग्यास शेख रशीद, युसूफ खान इब्राहीम खान, आसिफ मोंहम्मद दारा मोंहम्मद, शेख सादिक अब्दुल नबी, शेख मंजूर शेख कादर, शेख सलाउद्दीन रियाजोद्दीन, शेख कलीम शेख सलीम, आयुब खा
भुरे खा इत्यादी समाजबांधव उपस्थित होते.तसेच प्रांत अधिकारी फैजपूर यांच्या कार्यालयात जाऊन सावदा फैजपूर येथील मुस्लिम बांधवांनी देखील सदर मागणीचे निवेदन देऊन भारत सरकार यांना कळवले आहे. सदर निवेदन देतेवेळी शेख निसार शेख नबी, सैय्यद असगर सैय्यद तूकडू, अजमल खान बलदार खान, कमील शेख पत्रकार, इलियास खान हमीद खान, फिरोज खान सरवर खान, शेख कलीम शेख जलीस. असलम खान गुलाम गौस खान, शेख गुलाम शेख मंजूर, जफर खान जमशेर खान, जुनेद नसरुद्दीन लोहार इत्यादी मुस्लीम बांधव उपस्थित होते.






