मोठे वाघोदा येथे ग्रामपंचायत कार्यालयावर ध्वजारोहण
सरपंच वर्षभरापासून गैरहजरच..
मुबारक तडवी रावेर
रावेर : आज दिनांक 26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य संगीता स्वप्निल पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मात्र विद्यमान लोकनियुक्त सरपंच यांनी तब्बल वर्षभरापासून ग्रामपंचायतीकडे पाठ फिरवली आहे व भुसावळ तालुक्यातील कासवा (अकलुद) गावचे रहिवासी झालेले आहेत एक वर्षा पासून ग्रामपंचायत व मासिक मिटींग कडेही त्यांनी दुर्लक्ष केले असल्याने गावकऱ्यांना नरक यातना सोसाव्या लागत आहेत
आज दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ही विद्यमान लोकनियुक्त सरपंच अनुपस्थित च होतेध्वजारोहण प्रसंगी तलाठी वानखडे, ग्रामपंचायत सदस्य शे.चांद.शे.नबी उर्फ कालू मिस्तरी,संजय काशिनाथ माळी,भुषण चौधरी,हर्षल पाटील,, स्वप्निल पवार,अमिनाबाई तडवी,हाजराबी पिंजारी,साधनाबाई निळकंठ महाजन,हर्षा विशाल पाटील,मिनाक्षी हर्षल पाटील,भाग्यश्री वाघ,क्लार्क प्रकाश वायके, पंकज मालखेडे, शिपाई राहुल महाजन आदिंसह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.






