पेठ येथील कोरोना विरोधातील यंत्रणेचा खा.डॉ.भारती पवार यांनी घेतला आढावा
विशेष खबरदारी घेऊन परिस्थितीशी सामना करा- खा.डॉ.भारती पवार
सुनिल घुमरे नासिक
कोरोना विषाणु वाढत्या संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर खा. डॉ. भारती पवार यांनी पेठ तालुक्यातील आरोग्यासह आपत्कालीन यंत्रणेचा आढावा घेतला. त्यात प्रामुख्याने गरजूपर्यंत रेशन पोहचले की नाही? शेतकऱ्यांसाठी दोन हजार रुपये अर्थ सहाय्य, जनधन खाते धारकांना त्यांचे खात्यात पाचशे रुपये अर्थ सहाय्य, विधवा पेंशन लाभ तसेच उज्वला गॅस सिलेंडर लाभर्थ्यांना या सर्व योजनांचा लाभ मिळाला का? ह्यासह आपत्ती काळात सर्वसामान्य जनतेला रेशनचे धान्य वितरित झाले का?
केन्द्राने पाठवलेला पाच किलो मोफत तांदूळ वाटप अजूनही झाला नसल्याचे सांगून तो लवकरात लवकर वितरित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. आरोग्य यंत्रणा कितपत सुसज्ज आहे व काय काय अडचणी आहेत याचीही माहिती संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत घेतली. आणि त्यासंदर्भात आणखी काय खबरदारी घ्यावी याबाबत अधिक सूचना करण्यात आल्या. सर्व जनतेने प्रशाशनाच्या सूचनेचे काटेकोर पालन करावे. अति गरज असल्यास आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा अन्यथा पडू नये तसेच सोशल डिस्टन्सचे योग्य ते पालन करा. असेही आवाहन केले तसेच या आपत्तिच्या कठिन प्रसंगी डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, विविध खात्यांचे प्रशासकिय अधिकारी, सफाई कर्मचारी, विविध स्वयंसेवक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आपली व्यवस्थित काळजी घेण्याच्या सूचनाही खा. डॉ भारती पवार यांनी केल्या . ह्या प्रसंगी भाजपा पेठ तालुकाध्यक्ष संजय वाघ, शहराध्यक्ष त्र्यम्बक कामडी, पेठ तहसीलदार, बीडीओ, पेठ ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.






