Rawer

अज्ञात वाहनाची मोटारसायकल स्वारास धडक केळी मजूर तरुणाचा जागीच मृत्यू

अज्ञात वाहनाची मोटारसायकल स्वारास धडक केळी मजूर तरुणाचा जागीच मृत्यू

रावेर/ मुबारक तडवी

अंकलेश्वर -बुर्हानपुर महामार्गावरील सावदा – रावेर रस्त्यावर मोठा वाघोदा तालुका रावेर येथील सुकी नदी पुलाजवळील जयदीप पेट्रोलियम च्या पुढे सुसाट वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटारसायकल स्वारास थडक देत रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथील रहिवाशी ३२ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनुस उर्फ पिंटू इतबार तडवी (वय ३२) रा.मोठा वाघोदा बुद्रुक ता. रावेर असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, युनूस तडवी हा आई, पत्नी व दोन मुलांसह रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथे वास्तव्याला होता. शेतात केळी मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता रविवारी २३ एप्रिल रोजी युनूस सायंकाळी ६ वाजता दुचाकी (एमएच १९ बीबी ०३९५) ने सासरवाडी वडगाव तालुका रावेर येथे गेला होता तेथून परतत असतांना मोठा वाघोदा बु ते रावेर रस्त्यावर असलेल्या बाळू श्रावण महाजन यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने युनूस तडवीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत युनूस हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनचालक हा अंधारात वाहन घेवून पसार झाला. ही बाब युनूसचे काका हमीद हसन तडवी यांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असतांना पुतण्याचा मृतदेहपाहून हंबरडा फोडला. रावेर ग्रामीण रूग्णालयात मृतदेह नेण्यात आला. याप्रकरणी हमीद तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत युनूसच्या पश्चात आई जैनब तडवी, पत्नी काजल आणि दोन मुले असा परिवार आहे.पुढील तपास सपोनि जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विनोद पाटील हे तपास करीत आहेत तर घटनास्थळी पो कॉ संजय चौधरी मजहर पठाण रविंद्र महाजन विनोद तडवी आदींनी पंचनामा केला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button