कु अश्विनी वाळके यांना राष्ट्रीय युवा चेतना सन्मान जाहीर…!
मुंबई ; प्रतिनिधी / मिलिंद जाधव
मूळची सोलापूर जिल्ह्यातील पांढरेवाडी गावची व सध्या पुण्यातील पिंपरी चिंचवड मधील नामांकित कंपनीमध्ये अभियंता असणारी युवा समाजसेविका कु अश्विनी मोहन वाळके हिला “..काव्यमित्र प्रतिष्ठानचा ..” राष्ट्रीय युवा चेतना सन्मान जाहीर झाला आहे…!
आपली नोकरी संभाळत आश्रमातील मुलांचे 5 ते 10 वी पर्यंत गणित आणि इंग्रजी विषयाचे मोफत क्लास घेते
मुलींसाठी मेहंदी, रांगोळीचे क्लासेस घेऊन त्यांना
शालोपयोगी वस्तू वह्या, पुस्तके, स्टेशनरी पुरवते. विरंगुळा व आनंद भेटावं म्हणून सिनेमा तसेच नाटक दाखवले जातात..!
फ्रेन्डशिप डे, दिवाळी, नवीन वर्ष त्यांच्यासाठी पझल, गेम्स आयोजित करते !
*त्यांना स्टेज भेटावं आणि आत्मविश्वास वाढवा सर्वांसमोर येण्याचा म्हणून 10 आश्रमाना एकत्रित करून एक डान्स, गाणी, नाटक प्रोग्रॅम ठेवतो. स्वतः डान्स शिकवण्याची व्यवस्था करण्यात येते*
त्यांच्यासाठी ट्रेकिंग, ट्रिप, पिकनिक साठी मदत करते
अजून कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास आत्मीयतेने हजर राहते..! अश्विनी ला मिळालेल्या सन्मानाबद्दल आईवडील, गावकरी मंडळी व तिचे गुरुजन आणि सामाजिक संस्था तसेच विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे…! मुंबई चे शिक्षक कृष्णांत गायकवाड सर यांची विध्यार्थी आहे !






