मारवड

मारवड पोलिसांची नाकाबंदी मोहीम,43 वाहनांची कसून तपासणी

मारवड पोलिसांची नाकाबंदी मोहीम,43 वाहनांची कसून तपासणी

मारवड
मा.श्री पंजाबराव उगले सो पोलीस अधीक्षक जळगाव व मा श्री सचिन गोरे अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुसार मारवड हद्दीत गलवाडे रोड येथे पेट्रोल पंपाजवळ दि.२५/१२/१९ रोजी १०:०० ते १८:०० वाजेपावेतो आम्ही स्वत: राहुल फुला, पोहवा१८११ किशोर पाटील, पोना ३१८२ मुकेश सांळुखे, पोशि.२०२० सुनिल तेली व होमगार्ड रामकृष्ण चौधरी, विलास कोळी, श्रीराम राठोड, गौरव पाटील व रविंद्र महाले यांचे सह नाकाबंदी करुन ४३ वाहनांची कसुन तपासणी केली. ३ वाहनांवर ६६/१९२ प्रमाणे तर ५ वाहनांवर सिट बेल्ट न लावणे, कागदपत्र जवळ न बाळगणे म्हणुन दंडात्मक कारवाई करुन रु.१०००/- दंड वसुल केला.
आवाहन! आवाहन! आवाहन!
राहुल फुला, सपोनि, मारवड पो स्टे. याव्दारे आपणा सर्व नागरिकांना आवाहन करतो की, आपण आपले वाहन वापरतांना मुळ लायसन्स व आर सी बुक सोबत बाळगावे, किंवा कोणास आपले वाहन देत असल्यास संबंधीत चालकाकडे लायसन्स आहे का?, याची खात्री करावी अन्यथा लायसन्स नसलेल्या किंवा लहान मुलास वाहन दिले म्हणुन मुळ मालकावरच कारवाई होवु शकते.
प्राणांतिक अपघात रोखण्यासाठी नागरीकांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसवित असलेल्या वाहनांव्दारे प्रवास करणे टाळावे. सदरचा प्रवास प्राणघातक ठरु शकतो व कायद्यान्वये तो गुन्हा आहे. प्रवासी वाहतुक परवानाधारक वाहनांव्दारे किंवा एस.टी. व्दारेच प्रवास करावा. आपण ज्या वाहनामधे बसलेलो आहे त्या वाहनामधे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले तर नाही ना याची खात्री करावी. तसे आढळल्यास आम्हास संपर्क करावा.असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Back to top button