राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत विचार व्यक्त करीत आहेत
हे अतिशय संक्षिप्त अभिभाषण आहे. त्यातून सरकारची दिशा स्पष्ट होत नाही.
भिन्न विचारधारेचे पक्ष भविष्यात कसे सरकार चालविणार हे त्यातून दिसून येते
सर्वाधिक जागा आम्हाला मिळाल्या.
जनादेश आमच्या बाजूने
हे राजकीय स्वार्थाने बनलेले सरकार
जनतेच्या मनातील सरकार नाही
आम्ही कुठेही असलो आणि ते कुठेही असले तरी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी दैवताच्या ठिकाणीच राहतील.
पण, बाळासाहेबांना सेनेचा मुख्यमंत्री करण्याचा शब्द देताना, तो काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या मदतीने करण्याचा दिला होता काय?
शिवसेनेने चुका केल्या, तर त्याच्यामागे तत्वज्ञान उभे करण्याचा प्रयत्न करू नये
स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत दिली पाहिजे, 25,000 रुपये हेक्टरी मदत हा त्यांचा शब्द आहे, तो त्यांनी पाळावा
आश्वासनं स्वत:च्या भरवशावर द्यायची असतात आणि स्वत:च्याच भरवशावर पाळायची असतात.
आमच्या काळजीवाहू सरकारने 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर केले होते
संविधानाच्या तरतुदीनुसार किमान 12 मंत्री आवश्यक आहेत. यांनी फक्त 6 केले.
आम्ही आक्षेप घेतला नाही, कारण शेतकऱ्यांना मदत मिळण्यास उशीर होऊ नये. पण शेतकऱ्यांना मदत पण मिळत नाही
MSME क्षेत्रात 59 लाख रोजगार गेल्या 5 वर्षात निर्माण झाले, जे देशात सर्वाधिक आहेत.
सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. सुभाष देसाई यांना सर्व ठावूक आहे
राज्याची आर्थिक स्थिती ठीक नाही, असे सांगून ‘कव्हर फायरिंग’चा प्रयत्न होतो आहे.
सर्व निर्णयात शिवसेना सोबत होती. आता ते चूक होते, हे शिवसेनेकडून वदवून घेण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादी करणार आहे
राज्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे.
सर्व निकषांमध्ये राज्याची आर्थिक स्थिती आता अधिक चांगली आहे. हे मी नाही राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सांगतो. उगाच कारणं सांगण्यात अर्थ नाही
कर्ज घेतलं आणि ते विकासासाठी वापरलं!
पण असं करताना राज्याची आर्थिक घडी विस्कळू दिली नाही
ग्रामविकासच्या कामांना स्थगिती
नगरविकासच्या कामांना स्थगिती
तीर्थक्षेत्रांच्या कामांना स्थगिती
‘स्थगिती सरकार’ अशी प्रतिमा होणं धोकादायक. तत्काळ कामे सुरू झाली पाहिजेत
मुंबईतील सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू झाली.
समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले.
मराठा आरक्षण देण्याचे काम केले.
धनगर समाजाला न्याय देण्याचे काम केले. 1000 कोटी रुपये दिले. त्याला कृपया स्थगिती देऊ नये
या सरकारमध्ये ‘ त्रिशंकू’चा नवीन अर्थ समजला.
त्रिशंकू म्हणजे तीन पक्ष एकमेकांवर शंका घेणारे
या सरकारच्या अवस्थेचे ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या भारुडात उत्तम वर्णन केले आहे
#CAA हे वीर सावरकर यांच्या तत्वाविरोधात आहे, असे म्हणणाऱ्यांनी वीर सावरकर यांचे ‘मोपल्याचे बंड’ हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे
कुछ पन्ने क्या फटे
ज़िंदगी की किताब के
जमाने ने समझा
दौर हमारा खतम हो गया।
– देवेंद्र फडणवीस






