बुध्दाचा धम्म निती शिकवतो यासाठी नितीवान बनावे—प्रा.राजा जगताप
राहुल खरात
अणदूर
बुध्दाचा धम्म विचार, कोणतीही विषमता मानत नाही.माणसाला क्रेंद्रस्थानी ठेवतो.तो धम्म विज्ञानवादी व सत्यावर आधारित आहे.माणसातील नैराश्य ,दु:ख संपवतो व सुखी जीवन करण्यासाठी माणसाला उपयोगी पडतो.समता शिकवितो यामुळेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४आॅक्टोंबर१९५६ला नागपूर येथे बुध्द धम्माची दिक्षा घेतली व पाच लाख बांधवांनाही हा धम्म दिला आज ६३वर्षे झाली आहेत.म्हणूनच येथील आजच्या काळातअस्पृश्यांचा उध्दार झाला आहे.आज माणसं सैरभैर झाली आहेत.समाजात ढोंगीपणा वाढला आहे.आपली प्रगती करूण घेण्यासाठी व सुसंस्कारित होण्यासाठी आज नितीवान बनणे गरजेचे आहे.बुध्दाचा धम्म निती शिकवतो यासाठी प्रत्येकांनी नितीवान बनावे असे प्रतिपादन १४आॅक्टोंबर रोजी ६३व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनी अणदूर येथे आयोजित व्याख्याना प्रसंगी बोलताना गाव तेथे बुध्द विहार कादंबरीचे लेखक प्रा.राजा जगताप उस्मानाबाद यांनी केले आहे.सकाळी ९वाजता बौध्दाचार्य दादा बनसोडे यांनी वंदना घेतली होती याचे नियोजन सिध्दार्थ मंडळाने केले होते.दुपारी कराळी येथील भंतेजी धम्मसार यांनी धम्मदेशना दिली यावेळी त्यांना प्रदिप कांबळे सर यांनी चीवरदान केले होते.सिध्दार्थ कांबळे यांनी भंतेजींना धम्मदान केले.धम्मदेशनेचे नियोजन मातोश्री रमाई महिला मंडळ,क्रांती महिला मंडळ,च्या महिला कार्यकर्त्या यांनी केले होते.
पुढे बोलताना प्रा.जगताप म्हणाले की,डाॅ.बाबासाहेबांनी गोर,गरिब समाजाला माणूसपण मिळावे यासाठी आपली विद्वता पणाला लावली त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या गरिबांना अनेक तरतुदी दिल्यानेच आज गरिब,सामान्य माणूस प्रवाहात आला आहे.डाॅ.बाबासाहेबांनी समाजाला दिलेला धम्म हा सर्वांगीन मानव जातीचे कल्याण करणारा आहे समस्त बहुजनांचे कल्याण करणारी ताकद धम्म विचारात असल्याने बुध्दाने सांगितलेल्या नितीमार्गाचा आवलंब केल्यास सामान्य माणुस सुखी झाल्याशिवाय राहाणार नाही यासाठी नितीवान बनण्यासाठी बुध्दाच्या नितीवान धम्म विचाराचा आवलंब आंबेडकरी समाजाने करावा असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमासाठी अणदूर व आसपासच्या परिसरातील बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.दयानंद कांबळे,नागनाथ कांबळे,महादेव जेटीथोर,विशाल कांबळे,वैभव कांबळे आदींनी परिश्रम घेतले सूञसंचालन आर.एस.गायकवाड यांनी केले.
