Mumbai

Mumbai Diary : सरकारचा तुघलकी निर्णय..आमदार येताच अधिकारी–कर्मचाऱ्यांनी ‘उभे’ राहणे अनिवार्य
महाराष्ट्र सरकारचा नवा शासननिर्णय जारी

आमदार येताच अधिकारी–कर्मचाऱ्यांनी ‘उभे’ राहणे अनिवार्य
महाराष्ट्र सरकारचा नवा शासननिर्णय जारी…

मुंबई :
राज्य सरकारने शासकीय कार्यालयांमधील शिस्त आणि जनप्रतिनिधींप्रती आदर या तत्वावर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन शासननिर्णयानुसार, शासकीय कार्यालयांमध्ये आमदार (MLA) किंवा विधानपरिषदेचे सदस्य (MLC) भेटीस आल्यास, ते कार्यालयात प्रवेश करताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर म्हणून उभे राहणे बंधनकारक असणार आहे.

सर्व विभागांना यासंदर्भातील GR कळविण्यात आला असून, हा निर्णय तत्काळ लागू करण्यात आला आहे.

– GR मधील प्रमुख तरतुदी :

आमदार किंवा आमदारपरिषद सदस्य कार्यालयात आले की, उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचारी उभे राहून आदर व्यक्त करतील.

अधिकाऱ्यांनी विनम्र आणि सकारात्मक वर्तन राखणे आवश्यक.

अनुपालन न केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना.

सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्यातील कार्यालयांना GR ची माहिती देणे बंधनकारक.

– सरकारची भूमिका

सरकारने म्हटले आहे की, जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा मान राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कार्यालयीन शिस्त, कार्यकुशलता आणि समन्वय सुधारण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण शासनाने दिले आहे.

– GR लागू कधीपासून?

शासनाने हा GR तात्काळ प्रभावाने लागू केला असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, विभागीय आयुक्तांना आणि इतर विभाग प्रमुखांना आदेश पाठविण्यात आले आहेत.

आता UPSC,MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च पदांवर कार्य करणाऱ्या उच्च शिक्षित, सुसंकृत अधिकारी आणि कर्मचारी अशिक्षित, भ्रष्टाचारी,10 वी नापास, प्रचंड गर्व असलेल्या आमदारांसमोर उभे राहणार.. ज्यांना स्वतःला शिस्त नाही अशा लोक प्रतिनिधींसमोर शिस्तप्रिय अधिकारी आणि कर्मचारी उभे राहणार… वा.. शासनाचा तुघलकी निर्णय की स्वतःची गेलेली किंमत की प्रतिष्ठा परत मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न… विचार करा…. मतदारांनो…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button