गणितावर प्रेम करा, विषय सोपा होईल – वनिता अग्रवाल
फैजपुर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना गणित विषय कठीण वाटतो मात्र या विषयाच्या गणित सोडवण्यासाठी लागणारे ट्रिक्स, पाढे व क्लृप्त्या विद्यार्थ्यांनी समजून घेतल्यास विषय सोपा होतो एखादे गणित कठीण वाटले तर ते सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे यामुळे विषय अधिक सोपा होत असतो याकरता विद्यार्थ्यांनी गणित विषयाला कठीण न करता सोपे केले पाहिजे असे प्रतिपादन कलाम साहित्य सेंटरच्या सहसमन्वयक वनिता अग्रवाल यांनी केले
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त खिरोदा तालुका रावेर येथील कलाम सायंटिस्ट सेंटर मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहसमन्वयक वनिता अग्रवाल होत्या. यावेळी नेहरू विद्यामंदिर तळवेल येथील उपशिक्षक विनोद पाटील, मायक्रो व्हीजन चे नदीम शेख, एम एम नारखेडे विद्यालय रुईखेडा येथील उपशिक्षिका योगिता झांबरे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन केले. योगिता झांबरे यांनी रामानुजन यांच्या जीवन कार्य, हार्डी रामानुजन संख्या, तसेच रामानुजन यांनी लावलेले विविध शोध यांची विद्यार्थ्यांना माहिती दिली. व ट्रिक्स वापरून गणित कसे सोपे करता येते याचा उपयोग स्पर्धात्मक परीक्षांमध्ये होतो हे सांगितले.
नदीम शेख सर यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, विज्ञानाच्या विविध ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साह पूर्वक कार्यक्रमात सहभाग घेतला.






