Chandwad

नाशिक जिल्हा परिषदेत नवीन निवड झालेल्या ग्रामसेवकांना नियुक्तीची प्रतिक्षाच ..!

नाशिक जिल्हा परिषदेत नवीन निवड झालेल्या ग्रामसेवकांना नियुक्तीची प्रतिक्षाच

चांदवड विजय जाधव

नाशिक जिल्हा परिषद ग्रामसेवक भरती 2023 ची परीक्षा होऊन गुणांची यादी प्रसिध्द झाल्यानंतर जिल्हा परिषदेने विधानसभा आचारसंहिता लागणेअगोदर अगदी आदल्या दिवशी फोन करून दुसऱ्या दिवशी कागदपत्र पडताळणी करून घेतली.त्यानंतर निवडणूक होऊन 1 महिना उलटला तरीही अंतिम निवड यादी न लागल्याने ग्रामसेवकांच्या जॉइनिंग अजूनही झाल्या नसल्याने आज दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची नवीन तात्पुरत्या यादीतील उमेदवारांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे.नियुक्त्या कधी मिळतील याबाबत अजूनही ठोस माहिती मिळत नसल्याने उमेदवार चिंतेत असल्याचे आज दिसून आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button