Amalner

Amalner:मंगरूळ येथे एमआयडीसीत आग लागून लाखोंचे लाखाचे नुकसान..

Amalner:मंगरूळ येथे एमआयडीसीत आग लागून लाखोंचे लाखाचे नुकसान..

अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथे प्लास्टिक भंगाराच्या दुकानाला शॉर्ट सर्किट मुळे आग लागून सुमारे 7 ते 8 लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मंगरूळ येथे दि 20 रोजी रात्री सात वाजता एमआयडीसी मध्ये सैय्यद मुझफ्फर अली मोहम्मद अली यांच्या प्लास्टिक भंगार साहित्य शेडच्या बाहेर ठेवलेले होते. जवळच विद्युत ट्रान्सफॉर्मर होता आणि तेथून विद्युत तार गेलेले होते. अचानक विद्युत तारा तुटून प्लास्टिक भंगाराला आग लागली. प्लास्टिकने लगेच पेट घेतल्याने आगीचे प्रमाण वाढल्यामुळे परिसरात धावपळ सुरू झाली. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना कळवताच त्यांनी आगीचे दोन बंब पाठवले. अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी , फारुख शेख , जफर पठाण , सत्येंन संदानशीव , दिनेश बिऱ्हाडे , आकाश संदानशीव ,योगेश कंखरे ,आकाश बाविस्कर ,विकी भोई यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस दल देखील पोहचले. आगीने रौद्र रूप धारण केल्याने जवळ जाता येत नव्हते इतर साहित्य देखील काढता येत नव्हते. आग इतरत्र पसरू नये म्हणून दोन जेसीबी मशीन मागवण्यात येऊन उर्वरीत प्लास्टिक साहित्य वेगळे करण्यात आले. आगीमुळे विद्युत तारा तुटल्या तर ट्रान्सफॉर्मर जळाला आहे. तन्वीर अलीने दिलेल्या फिर्यादी नुसार अकस्मात आगीचा गुन्हा अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे .तपास हे.कॉ. कैलास शिंदे करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button