Maharashtra

Breaking: राज्यात अवकाळी पाऊस “ह्या” दिवसापासून… राज्यात बसणार शेतकऱ्यांना मोठा फटका…

Breaking: राज्यात अवकाळी पाऊस “ह्या” दिवसापासून.. राज्यात बसणार शेतकऱ्यांना मोठा फटका…

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाब रावांनी एक नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. पंजाबराव डख यांनी आज 19 डिसेंबर 2024 रोजी जारी केलेल्या एका नवीन हवामान अंदाजात राज्यात येत्या दोन दिवसांनी अर्थातच 21 डिसेंबर पासून पाऊस सुरू होणार असे म्हटले आहे. राज्यात 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान पाऊस पडणार आहे मात्र या काळात सर्व दूर पाऊस राहणार नाही.

या काळात राज्यात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. डख यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यात 21 आणि 22 डिसेंबरला यवतमाळ चंद्रपूर वर्धा गडचिरोली छत्तीसगड कडे पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 23 डिसेंबरला हा पाऊस नागपूरकडेच राहणार आहे.मात्र 24 ला वातावरणात एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो. याच वातावरणातील बदलामुळे 25 डिसेंबर पासून राज्यातील मराठवाडा व आजूबाजूच्या परिसरात जसे की जळगाव संभाजीनगर जालना अमरावती अकोला वर्धा बुलढाणा परभणी अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर जत या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.म्हणजेच 21 ते 26 डिसेंबर दरम्यान राज्यात सर्व दूर पाऊस पडणार नाही तर भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात 21 डिसेंबर पासून ते 24 डिसेंबर पर्यंत विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मात्र 25 डिसेंबर पासून अवकाळी पाऊस मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे. जवळपास 26 ते 27 डिसेंबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी यावेळी वर्तवला आहे.

खरे तर बंगालच्या उपसागरात नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका चक्रीवादळाची निर्मिती झाली होती आणि या चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला होता.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे तमिळनाडू पुदुच्चेरी आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आणि असाच प्रभाव आपल्या महाराष्ट्रात देखील पाहायला मिळाला.

दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या म्हणजेच 19 आणि 20 डिसेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वेधशाळेने दक्षिण कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तसेच दक्षिण मराठवाड्यात पावसाचा अंदाज दिला आहे. वेधशाळेप्रमाणेच पंजाब राव डख देखील महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांनी पावसाला सुरुवात होणार असे म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button